Singer – Praveen Done,
Lyrics – Sharadh Mane
दोन वर्ष अकरा महिने अठरा दिस
किती सोसल भीमान
पावाच्या तुकड्यावर काढीले दिस
तरी थकला ना कामान
साथ रमाची बुध्द धम्माच मिळाल वरदान
हरपुन भान जीवच करुनी रान लिहिल संविधान…२
कुणाची मिळाली न साथ
आजवर झाला हो आगाथ
पुस्तकासवे काढली रात
दिव्याखाली झोपली माझी जात
रक्ताच नव्हत नात
पेटवली आयुष्याची वात
मायेन भरवला तो घास
शिजल नाही जरी घरात
डोळ्याच पाणी सांगते वाणी थोर ते योगदान
हरपुन भान जीवच करुनी रान लिहिल संविधान…२
कुणाचे दुःख कुणा कळते
भीमावीन रमा तळमळते
दुःखाच्या अग्निमध्ये जळते
ऐकताच रक्त सळसळते
निभावली रमा बंधनाला
करुनी बुध्द वंदनाला
भीमाची वाट किती पाहीली
गेले होते भीम परदेशाला
या अनुयायीन घाईघाईन करुनी मतदान
हरपुन भान जीवच करुनी रान लिहिल संविधान…२
दोन वर्ष अकरा महिने अठरा दिस
किती सोसल भीमान
पावाच्या तुकड्यावर काढीले दिस
तरी थकला ना कामान
साथ रमाची बुध्द धम्माच मिळाल वरदान
हरपुन भान जीवच करुनी रान लिहिल संविधान…२


