| घटक | माहिती |
|---|---|
| गीत | “दूरदेशी जाता हो धनी” (Ramai song) |
| गायक | प्रजावती भारसळकर (Prajavati Bharsakale) |
| गीतकार | दयानंद इंगले (Dayanand Ingale) |
दूरदेशी जाता हो धनी
तुम्ही माझ्या गळ्याचे मनी.. ll ध्रु II
थापिन गवऱ्या कष्ट करीन
सेवेत तुमच्या जाईल मरूनी
हीच आहे माझी मागणी
तुम्ही माझ्या गळ्याचे मनी….ll 1ll
मन लावूनी करा अभ्यास
एकच असू द्या तुमचा ध्यास
या हो तुम्ही खूप शिकून
तुम्ही माझ्या गळ्याचे मनी…ll 2ll
जाता जाता एवढे आहे ऐका
पत्राचा पाठवा एक चिरोटा
या हो तुम्ही खूप शिकवणी
तुम्ही माझ्या गळ्याचे मनी.. ll 3ll
परदेशाला प्रयाण झाले
नयन हे माझे भरून आले
डोळ्यांसमोर दिसता नेहमी
तुम्ही माझ्या गळ्याचे मनी.. ll4ll
कीर्तीचा तुमच्या वाहो सुगंध
सेवेत राहील दयानंद
मधुरा गाईल कोकीळ गाणी
तुम्ही माझ्या गळ्याचे मणी..ll 5ll


