सजलाय गावं सारा, सजली भीमवाडी | Sajalay Gav Sara Sajali Bhimwadi Song Lyrics

श्रेणी माहिती
गीताचे नाव सजलाय गावं सारा, सजली भीमवाडी
गायक (Singer) संघर्ष जाधव (Sangharsh Jadhav)

सजलाय गावं सारा, सजली भीमवाडी

काढा एक सेल्फी माझा,

निळी निळी साडी

कपाळी निळा टिळा

मिशीला मारा पिळा आहो

धनी घ्या हातात झेंडा निळा

 

भीम जयंती येते दर वर्षाला

सीमाच नाही बाई मन हर्षला

नाचतिया माय माझी, बाप अन् बेटा

सूट बुट कोट टाय, बांधूनीया फेटा

विचार सोडून शिळा

 

लय भारी भीम माझा भिम गुणकारी

जय भीम जय भीम देऊ ललकारी

लाखाचा हार माझ्या, सूनाचा गळ्यात

करोडोचा मालं बाई खळ्यात मळ्यात

सोन्याचा हती ईळा

 

आज मान पान बाई भीम वरदान

विचाराचं धन आम्ही झालो धनवान

सुखं सार दारी, बापाचं दान

रोज एकु येत माझा गुणगुण च गाणं

रमेशाची गाते कोकिळा

 

Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.