विजयादशमी दिनी | Vijayadashmi dini Buddha song lyrics

श्रेणी माहिती
गीताचे नाव श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी (दीक्षा आम्हा दिली भीमाने…)
काही आवृत्त्यांमध्ये गायक (Singer) आदर्श शिंदे (Adarsh Shinde)
इतर गायक प्रल्हाद शिंदे (Pralhad Shinde)

श्री बुद्धाच्या चरणावरती, विजयादशमी दिनी

दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनीं

मूळ गाडण्या विषमतेचे, मार्ग असा वेचला

मानवतेचा अन समतेचा धर्म नवा घेतला

श्री बुद्धाच्या महामंत्राचा, निनादला तो ध्वनी

थोर भाग्य हे दलित जनाचे भीमरत्न लाभले

व्यथा तयाची दूर जाहली, कार्य महा साधले

सोने लुटूनी मांगल्याचे लोक हर्षले मनी

कितीक झाले या अवनीवर, संत मुनी ज्ञानी

करू न शकले आजवरी ते, केले भीमाने झणी

उद्धरली नवकोटी जनतारूढी मोडुनी जुनी
दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनीं