नमस्कार घ्यावा, अहो बुद्ध देवा | Namaskar ghyava aho Buddha deva song lyrics

श्रेणी माहिती
गीताचे नाव नमस्कार घ्यावा, अहो बुद्ध देवा
गायक (Singer) सुरेश वाडकर (Suresh Wadkar)
गीतकार (Lyricist) मंगेश पाडगावकर (Mangesh Padgavkar)
संगीतकार (Music Director) मधुकर पाठक (Madhukar Pathak)
आलबम (Album) बुद्धं शरणं गच्छामि (Buddham Sharanam Gachchhami)
शैली (Genre) बुद्धगीते / Devotional Song

नमस्कार घ्यावा, अहो बुद्ध देवा
घुमे प्रार्थना, अंतरी दीप लावा

हरा दुःख भ्रांती, तुम्ही दिव्य शांती
दिला या जगा, मंत्र कारुण्य सेवा

नसे भेद काही, आता खेद नाही
असा लाभला, थोर आनंद ठेवा

मने शुद्ध जेथे, वसे बुद्ध तेथे
नुरो या जगी, क्रूरता द्वेष हेवा

नमो शुद्ध रूपा, नमो आत्मदीपा
तमातून या मानवा मार्ग दावा