| श्रेणी | माहिती |
|---|---|
| गीताचे नाव | माझ्या भीमरायावाणी सांगा पुढारी होईल का |
| प्रारंभिक ओळी | सुज्ञानाचा निर्मळ झरा / भीमासारखा माणूस खरा / जन्मा येईल का |
| गीतकार (Lyricist) | गोधान सावंत (Godhan Sawant) |
| गायक (Singer) | मिलिंद शिंदे (Milind Shinde) |
सुज्ञानाचा निर्मल झरा
भीमासारखा माणूस खरा
जन्मा येईल का
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का
मानापाणाला कधीच नाही चुकून हा पापणारा
धंनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा
वादळातली समजनौका किनारी लविल का
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का
करुणेचा सागर होऊन करुणेने कळवळणारा
दिनदलितासाठी दिन रात्री तळमळणारा
भीमासारखा कर्तुत्वाचा पहाड होईल का
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का
देश विदेशी जनता ज्ञान बघून चकित होई
अशी भीमाची करणी तिला जगात मोलचं नाही
अशीच गोधन दिनदलितांची ओझी वाहिल का
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का
सुज्ञानाचा निर्मल झरा
भीमासारखा माणूस खरा
जन्मा येईल का
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का
असा पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का


