अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1 | योजनेचे नांव | अत्याचाराचे बळी ठरणा-या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना |
2. | योजनेचा प्रकार | राज्य |
3. | योजनेचा उद्देश | अत्याचार पिडीत अनु.जाती जमतीच्या कुटुंब किंवा व्यक्तीस जिल्हा दक्षता नियत्रंण समितीच्या मान्यतेने आर्थिक मदत देऊन पुनर्वसन करणे/ |
4. | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव | अत्याचाराचे बळी ठरणा-या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातील पिढीत व्यक्ती |
5. | योजनेच्या प्रमुख अटी | जातीयतेच्या कारणावरुन अनुसूचीत जाती, अनुसूचित जमातीच्याकुटुंबावर /व्यक्तीवर अत्याचार घडल्यास सदर गुन्हयाची नोंद नागरीहक्क संरक्षण अधिनियम 1955 व (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 खाली झालेला असल्यास आवश्यक त्या गुन्हयात वैधकीय प्रमाणपत्र आवश्यक व सर्व गुन्हयामध्ये जातीचा दाखल आवश्यक. |
6. | दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप | गुन्हयाचे स्वरुपावरुन अर्थसहाय्य मंजुर करण्यात येते |
7. | अर्ज करण्याची पध्दत | |
8. | योजनेची वर्गवारी | सामाजिक सुधारणा |
9. | संपर्क कार्यालयाचे नांव | संबधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण |