सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना – महाराष्ट्र शासन

सावित्रीबाई फुले  शिष्यवृत्ती योजना – महाराष्ट्र शासन

12 जानेवारी, 1996 अन्वये विजाभज विद्यार्थीनीं करिता व शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर, 1996 पासून भटक्या विमुक्त जाती

प्रवर्गाच्या विद्यार्थींनींना सुध्दा लागू करण्यांत आली आहे. सदरहू प्रवर्गाच्या विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी  करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते.

* ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव

भटक्या विमुक्त जाती जमाती /  विशेष मागास वर्ग

*अटी

1 विद्यार्थीनी विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावी.

2 विद्यार्थीनी इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणारी असावी.

3 विद्यार्थीनी ही शासन मान्य शाळेत नियमित शिकणारी असावी.

* लाभाचे स्वरूप

प्रत्येक विद्यार्थीनीस दरमाह रुपये 60/- याप्रमाणे 10 महिन्या करीता रु.600/- शिष्यवृत्तीची रक्कम संबंधीत लाभार्थ्यांस देऊ केली जाते. 

* अर्ज करण्याची पद्धत

योजनेचे संगणकीकरण झालेले असून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी https://mahaeschol.maharashtra.gov.in या वेबसाईटवर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थिनींचे अर्ज / माहिती भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावी.

* संपर्क करण्यासाठी कार्यालयाची नावे 

संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.

सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/ उपनगर.

संबंधित शाळांचे मुख्याध्यापक.

धन्यवाद...

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?