पुण्यातील आंबेगाव तालुका येथे बुध्द जयंतीचे आयोजन दि. १६ मे २०२२ रोजी करण्यात आले होते.
बुध्द पूर्णिमेच्या दिवशी आदर्श गाव भागडी येथे संयुक्त जयंती निमित्य वातावरण हर्षोल्लासाने भरून गेले होते. तथागत गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या घोषणाने परिसर दणाणून गेला होता.
गावातील पहिल्यांदाच अशा देखण्या जयंतीचे समितीच्या वतीने आयोजन करण्यात आलेले होते. सर्व समाजातील लोकांनी ह्या जयंती मिरवणूक सोहळ्यात भाग घेतलेला होता. अगदी ज्येष्ठ नागरिक सुध्दा जयंती दिनी मंत्रमुग्ध होऊन लेझीम चा ठेका धरलेले पाहायला मिळाले.
कार्यक्रमातील काही क्षणचित्रे
महापुरुषांनी एकोपा चा, भाईचारा चा संदेश दिलेला ह्या दिनी पाहायला मिळाला.
या निमित्ताने सर्व समाज बांधव मिळून आदर्श गाव भागडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे बौद्ध पौर्णिमा दिनांक 16/05/2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आलेली. तसेच विचारवंताचे मनोगत, सभा व व्याख्याना चा कार्यक्रम पार पडला.
जयंती दिन कार्यक्रमाचे फार देखणे असे आयोजन एकता महासंघ आदर्श गाव भागडी व तसेच आयु. भालेराव सर, सतीश भाई कसबे व गावातील प्रतिष्टीत व्यक्तीने केले होते.