अ.क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1 | योजनेचे नांव | आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना |
2. | योजनेचा प्रकार | राज्य |
3. | योजनेचा उद्देश | अस्पृश्यता निवारण करण्याचा एक भाग म्हणून आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक योजना |
4. | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव | महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी |
5. | योजनेच्या प्रमुख अटी | लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा लाभार्थी /विवाहीत जोडप्या पैकी एकजण हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.( जातीचा दाखला देणे आवश्यक)लाभार्थी /विवाहीत जोडप्या विवाह नोंदणी /दाखला असावा.विवाहीत जोडप्याचे लग्न समयी वय वराचे 21 वर्षे व वधूचे 18 वर्षे पूर्ण असावे.( वर/वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले)दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्रेवधु /वराचे एकत्रित फोटो. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या |
6. | दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप | आंतर जातीय विवाहास रु 50000/- पतीपत्नीच्या सयुक्त नांवाने धनाकर्ष. |
7. | अर्ज करण्याची पध्दत | विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडून घेऊन विवाहीत जोडप्याने अर्जात नमूद कागदपत्राच्या मुळ व प्रमाणित प्रतीसह अर्ज प्रत्यक्षात सादर करावा. |
8. | योजनेची वर्गवारी | सामाजिक सुधारणा |
9. | संपर्क कार्यालयाचे नांव | संबधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/ मुंबई शहर व उपनगरसाठी समाज कल्याण अधिकारीबृहमुंबईचेंबूर |
Official Website: https://sjsa.maharashtra.gov.in/
Hindu Darji kis category me ata he?