आकाश मोजतो भीमा आम्ही तुझ्यामुळें। Aakaash Mojato Aamhi Bhima Tujhya Mule Song Lyrics |

Song: Aakash mojato amhi
Singer: Vaibhav Khune
Lyrics: Sarang Pawar
Music: Vikrant Mohite and Manoj Mohite

 

आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे

वादळ ही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे

बंदूक तोफ नको रे… अणूबॉम्ब ही नको रे

शब्दाने मारतो आम्ही भीमा तुझ्यामुळे

छळले आम्हास पिळले धर्मांध दानवाने

जातीस जाळतो आम्ही भीमा तुझ्यामुळे

शिर कापले तरिहि वंदन तथागताला

येथेच वाकतो आम्हि भीमा तुझ्यामुळे

केले स्वयंप्रकाशित ज्ञानाने आज सारंग

सूर्यास झाकतो आम्हि भीमा तुझ्यामुळे

* * * * *

आंबेडकरी चळवळीच्या अधिक माहिती विषयी आमच्या फेसबुक पेजला Like करा.https://www.facebook.com/brambedkar.in/

आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.

https://www.youtube.com/@jaybhimjaybharat9873

 

Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.