दिसें ती रमा शोभून, सुभेदाराची सून | Dise ti Rama shobhun song lyrics

नवरदेव झाला ,भीमबा ,नवरी रमाई ती ..2
आणि हसली तेव्हा…आत्या मीराबाई ती ..
नवरदेव झाला भीमबा ~~~Music

दोघांच्या डोक्यावरती, रामजीने ठेवीला हाथ 2
पडल्या त्या अक्षता, भीमरमाईच्या लग्नात
दिसें ती रमा शोभून, सुभेदाराची सून.,3

भायखळया च्या बाजारात, झालं होतं लग्न
आशीर्वाद ते,देण्या दोघांना,सारेच होते मग्न,
आनंदाने भिजले, वऱ्हाडी मंडपात 2
पडल्या त्या अक्षता भीम रमाईच्या लग्नात
दिसें ती रमा शोभून, सुभेदाराची सून. 3

चौघडे ते वाजत होते ,सनई लागल्या वाजू
लहान पोरं, बसली सारी, वधू वराच्या बाजू
लागले भीमाचे लग्न ,मासोळी च्या बाजारात 2
पडल्या त्या अक्षता ,भीम रमाईच्या लग्नात
दिसें ती रमा शोभून, सुभेदाराची सून. 3

रमा भीमाला बसवून खांदी ,वरात चालली होती
इवलीशी ती ,नवरी रानी ,सासरी चालली होती.
लग्न भीमाचे सतलज, लिहितोया आनंदात 2
पडल्या त्या अक्षता भीम रमाईच्या लग्नात
दिसें ती रमा शोभून, सुभेदाराची सून. 4

जयभीम