महाकवी वामनदादा कर्डक यांच्या सुप्रसिद्ध भीमगीत रचना

चांदण्याची छाया कापराची काया:-
चांदण्याची छाया कापराची काया,चांदण्याची छाया कापराची काया,
माऊलीची माया होता माझा भीमराया,माऊलीची माया होता माझा भीमराया,
माऊलीची माया होता माझा भीमराया।।२
चोचीतला चार देत होता सारा,चोचीतला चार देत होता सारा,
आईचा उभारा देत होता सारा,आईचा उभारा देत होता सारा,
भिमाई परी चिलया पिल्यावरी, भिमाई परी चिलया पिल्यावरी,
पंख पांघराया होता माझा भीमराया,माऊलीची माया होता माझा भीमराया,
माऊलीची माया होता माझा भीमराया।।
बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा,
लोपली निराशा आता,लोपली निराशा आता,,
सात कोटी मधी विकासाच्या आधी,सात कोटी मधी विकासाच्या आधी,
विकासाचा पाय होता मजा भीमराया,,माऊलीची माया होता माझा भीमराया,
माऊलीची माया होता माझा भीमराया।।
झाले नवे नेते मलाई चे धनी,झाले नवे नेते मलाई चे धनी,
वामन च्या मणी येति जुन्या आठवणी,वामन च्या मणी येति जुन्या आठवणी,
झुंज दिली खरी रामकुंडावरी,झुंज दिली खरी रामकुंडावरी,
दगड गोटे खाया होता माझा भीमराया,,,माऊलीची माया होता माझा भीमराया,
माऊलीची माया होता माझा भीमराया।।
चांदण्याची छाया कापराची काया,चांदण्याची छाया कापराची काया,
माऊलीची माया होता माझा भीमराया,माऊलीची माया होता माझा भीमराया,
माऊलीची माया होता माझा भीमराया,माऊलीची माया होता माझा भीमराया,
माऊलीची माया होता माझा भीमराया।।
* * * * *
भीम माझा कसा होता…
काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता
लेकराला जशी माता , भीम माझा तसा होता !
झुंज देऊन काळाशी , सात कोटी गुलामांचा
उंचविला इथे माथा , भीम माझा असा होता !
रास लावून ज्ञानाची , वाटली ती गरिबांना
पहिला ना कधी जो , तो पामराला पसा होता !
कायद्याच्या स्वरूपाने त्याच माझ्या दयाळाने
दान केला ह्या देशाला , ज्ञान साठा असा होता !
वाट खर्चास जाताना , गौतमाच्या निवासाला
दिला काढून कमरेचा , बांधलेला कसा होता !
अंतःकरणाच्या पाटीवर , दीनदुबळ्या समाजाच्या
युगे युगे राहील , तो भीम माझा ठसा होता !
काय सांगू तुला वामन , भीम माझा कसा होता
सात ठिगळांच्या बंडीचा , भीम माझा खिसा होता !
* * * * *
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते.
वाणीत भीम आहे, करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते
. भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयाचे न्यारेच टोक असते.
वाणीत भीम आहे, करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते
.
गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खऱ्याचे दुसरेच टोक असते.
तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते.
सदभाव एकतेचे जर अंतरात असते
चुकले कुणीही नसते सारेच एक असते.
वामन समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझिया क्रुतिप्रमाणे सारेच नेक असते.
अंधारलेली वाट माझी
मी प्रकाशित हाेताना पाहिली
तु लाविलास दिवा इथं क्रांतीचा
क्रांतीची आज मशाल हाेताना पाहिली…
झिजलास तु चंदनासारखा
गावकुसाबाहेरची झाेपडी हाेताना पाहिली
तु दिलास मिळवुन हक्क शिक्षणाचा
अन् काेटी काेटी माणसं मी बुकं वाचताना पाहिली
तुझ्या हातातला पेन रे बा भिमा
ती लेखणी तलवार हाेताना पाहिली
हाेतं ना तुझं त्या रामुवर प्रेम
ती रामु काेटी काेटी लेकरांच्या
मनात आई हाेताना पाहिली
काेटी काेटी लेकरांच्या उध्दारासाठी
तुझी ती चार लेकरं जळताना पाहिली
डाेळ्यात पाणी दाटुन तुझ्या त्यागाची कहाणी
मी इतिहासाच्या पाना पानात पाहिली
शाेधलास भारतातला ज्ञानाचा दिप तु
पुन्हा भारताची भुमी बुध्दमय हाेताना पाहिली
येवल्याला तु केली हाेती ना प्रतिज्ञा
नागपुरच्या नागभुमीत ती खरी हाेताना पाहिली
काय दिलंस तु कसं शब्दात व्यक्त करु
तुझ्या जिवनाची वामन कविता हाेताना पाहिली
जागवलास रे बा भिमा तु स्वाभिमान आतला
ताटातल्या भाकरीत आज
तुझी सही हाेताना पाहिली
सखा रे
सखा रे अण्णाभाऊ साठे
आमचा सखा रे।।धृ।।
माळावरचं रान फुलेचं
हेरलं माझ्या भिमानं
जे जे उगवत ते ते सारं
पेरलं माझ्या भिमानं
जपा रे ह्या साठेंच्या
उभ्या पिकाला जपा रे
सखा रे अण्णाभाऊ साठे
आमचा सखा रे।।१।।
कोल्हापूरचा शाहू राजा
मैतर माझ्या भिमाचा
कणखर पाठीराखा होता
तोच माझ्या भिमाचा
नका रे त्या राजाला
मुळीच विसरू नका रे
सखा रे अण्णाभाऊ साठे
आमचा सखा रे।।२।।
तुम्हीच पिकवा तुम्हीच टिकवा
ज्योतीबांचा मळा हा
असाच पिकवा असाच टिकवा
वामनवानी लळा हा
नका रे ही माळ्याची मका
कुर्तडू नका रे
सखा रे अण्णाभाऊ साठे
आमचा सखा रे।।३।।
=========
‘तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफान वारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे.
हल्ल्यावरती होती हल्ले अभंग अमुचे बाले किल्ले
असाच ताठर माथा अमुचा जरा न खाली लवे
हाय बिचारा दुबळा वारा निर्दयतेने करीतो मारा
ह्या वाऱ्यादने मावळणारी जात आमुची नव्हे.
तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणाकणातून
भीमयुगाच्या निरांजनातून तेल मिळाले नवे.
काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे
करील काळे आपुले अता काळ्या करणीसवे.
एक दिव्याने पेटवलेले,चरितेसाठी पाठविलेले
काळ्या रानी अखंड येथे फिरती आमुचे थवे.
जळू परंतू धरती उजळू ,प्रकाश येथे असाच उधळू
सदा चांदणे सुखी नांदणे हेच अम्हाला हवे.
====
चांदण्याची छाया कापराची काया
चांदण्याची छाया कापराची काया
माऊलीची माया होता माझा भीमराया….
चोचीतला चारा देत होता सारा
आईचा उबारा देत होता सारा
भीमाईपरी चिल्यापिल्यावरी
पंख पांघराया होता माझा भीमराया….
बोलतात सारे विकासाची भाषा;
लोपली निराशा आता…लोपली निराशा ;
सात कोटीमधी विकासाच्या आधी
विकासाचा पाया होता माझा भीमराया….
झाले नवे नेते मलाईचे धनी ;
वामनाच्या मनी येती जुन्या आठवणी;
झुंज दिली खरी रामकुंडावरी;
दगडगोटे खाया होता माझा भीमराया….. .’
=====
‘सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?
घाम शेतात आमचा गळे, चोर ऐतच घेऊन पळे
धन चोरांचा हा पळण्याचा फाटा कुठाय हो?
न्याय वेशीला टांगा सदा, माल त्याचा की आमचा वदा
करा निवाडा आणा तराजु , काटा कुठाय हो?
लोणी सारं तिकडं पळं, इथं भुकेनं जिवडा जळं
दुकानवालेदादा आमचा आटा कुठाय हो?
इथ बिऱ्हादड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर
या दुबळीचं धुडकं-फडकं धाटा कुठाय हो?
इथं मीठ मिरची अन् तुरी, तिथं मुरगी काटा सुरी
सांगा आम्हाला मुरगी कटलेट काटा कुठाय हो?
शोधा सारे साठे चला, आज पाडा वाडे चला
वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठाय हो?’
=======
‘भिकारी होऊनी दारी तुझ्या मी दान मागावे
दीनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे.
उपाशी जीव हे कोटी तयांची भूक भागावी
कशासाठी तुझ्याकडचे भीमाचे ज्ञान मागावे.
निवारा ना कुठे थारा अशांच्या आसऱ्याासाठी
मनाच्या मंदिरी थोडे तयांना स्थान मागावे.
भूमी ती भीमरायाची तुझ्या हाती अता आली,
मलाही पेरणीसाठी जरासे रान मागावे.
तुझी निष्ठा, तुझे जीवन, तुझी श्रद्धा भीमावरची
नसावी नाटकी “वामन” खरे बलिदान मागावे..’
===
‘समाधीकडे त्या वाट हि वळावी
तिथे आसवांची फुले हि गळावी
जिथे माउलीचे चिता हि जळाली
धूळ त्या स्थळाची मस्तकी मळावी
लाविता समाधी समाधी समोरी
दशा या जीवाची आईला कळावी
पाहण्या सदा त्या मुख माउलिचे
तिथे थोडी जागा मला हि मिळावी
वामन मला तू जाळशील जेव्हा
माधी पुढे त्या चिता हि जळावी….’
====
‘भीमा तुझ्या महूला जाऊन काल आलो
तू जन्मल्या ठिकाणी, राहून काल आलो
तू रांग्लास जेथे, तेथेच मान झुकली
ती धूळ मी कपाळी, लावून काल आलो
आई तुझी भिमाई, सातारालाच गेली
तेथेही दोन अश्रू , वाहून काल आलो
जाऊन दूर देशी, तू आणली शिदोरी
तेथे तुझेच पाणी, दावून काल आलो
दीक्षा भूमी सभोती, हर्षाने दाटलेली
नागाची नाग नगरी, पाहून काल आलो
देह जाळणार होते, मी टाळणार होतो
वामन सवेच तेथे, धावून काल आलो ‘
===
‘गेली आई भिमाई , झालीस तूच आई
आई तुला कसा गं, पान्हाच येत नाही|| धृ ||
आई तुझ्या दुधाने ,हि भूक जायीन गं
हि भूक , माझ्या पोटात मायीना गं || १ ||
ज्या थोरल्या पिलांच्या , पंखात जोम आला
तो आज येथे , घरट्यात राहीना गं || २ ||
वाहवायाची भिमाई , चिंता चील्यापिल्यांची
कोणी मुळीच आता , ढुंकून पाहीना गं|| ३ ||
जो काळ गात होता , अश्रूत न्हात होता
वामन तुझा तुझी ती, गाणीच गायींना गं|| ४ ||’
===
नराधमांच्या तंगड्या तोडा असं त्वेषाचं बळ ते देतात.
‘अन्यायाची चिरा चाम्बडी,चिरा करा चिंधड्या
चिरा करा चिंधड्या नाही तर भर हाती बांगड्या
गावामधले पिसाडलेले गुंड गीधालापारी
तुटून पडती तुमच्या माझ्या माता-बहिणीवरी
चल चल त्या नराधमांच्या तोडू चला तंगड्या
बहाद्दरांची फौज फाकडी गाव कुसाला भिडून
छ्लनाराला चिरीत जावी वाघावानी चिडून
जयभिमवाल्या अशाच अपुल्या करा पलटणी खड्या
आहे का रे वामन असले तरुण इथे कोणी
सामाजक्रांतीमधून झाली पिढी ज्यांची ऋणी
नकोत नुसत्या शब्द -सुरांच्या भाषणआतल्या उड्या…’
===
‘केस माझे हे जेव्हा गळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले…
जात होतो पुढे जात होतो पुढे
ह्यात होतो पुढे त्यात होतो पुढे
पाय त्यांचेच मागे वळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले…
बाग मागे आणि आग होती पुढे
पंख पसरीत गेलो मी ज्योती पुढे
पंख सारेच तेथे जळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले…
एक सेवक होऊन सेवा दिली
लोक उलटून म्हणतात केव्हा दिली
बोल उलटे हे जेव्हां मिळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले…
गोडी होती मधाची मला जोवरी
लाख लटकून होते मोहोळा परी
संपता अर्क सारे पळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले…
काल वामन परी पेरण्या ही कला
येत होते आणि नेत होते मला
जाणे माझे हे तेथे टळू लागले
तेव्हा जीवन मला हे कळू लागले…’
=====
‘पाणी वाढ गं
लयी नाही मागत भर माझं
इवलंसं गाडगं,
पाणी वाढ गं,
काळानं केलं काळं
जातीचं विणलं जाळं
पाण्याच्या घोटासाठी
तळमळतंय माझं बाळ
पाज आम्हाला पाणी
अन मग डोळे फाडं गं ……
गाईला हिरवा चारा
जळणाचा लाकूडफाटा
मी आणून देईन सारा
करील सारं काम तुझं मी
झाडील वाडगं ……
साऱ्यांच्या पडल्या पाया
आली ना कुणाला माया
पाण्याच्या थेंबासाठी
तळमळते माझी काया
कर्माचा ना धर्माचा
एक पोहरा वाढ गं ………..’
=====
‘काल भीमाच्या क्रांतीचे
तुम्हीच बारा वाजविले || धृ ||
काल आम्ही लढनारांनी
कडे कडे चढनारांनी
बंड भीमाचे गाजविले || १ ||
अशाच साऱ्या बाळांनी
बाळांनी चांडाळांनी
नपुसकांनी लाजविले || २ ||
वामन वाणी लुटनार्यांनी
गली गलीच्या कुत्रांनी
भांडण सारे माजविले || ३ ||’
=====
‘आज तरी क्रांती साठी वाट भीमाची तू धरशील का?
उठून सारा देश तुझा आज उभा तू करशील का?
उकिरड्यावर चारणारा,तिथेच राहून मारणारा
झाली आजादी तरी हिरव्या राणी चारशील का ?
आज तरी क्रांतीसाठी……..
तो धनी तू चाकर का
तुलाच थोडी भाकर का?
सांग अश्या लाचारीने पोट तरी तू भरशील का?
आज तरी क्रांतीसाठी……..
धन्वन्ताची जात पहा
बसली लाडू खात पहा
कसा उपाशी तूच असा
सांग अश्याने तरशील का ?
आज तरी क्रांतीसाठी……..
तू वनवासी आदिवासी
कंद मुले का रे खासी
तुझा लढा तू लड्ताना
सांग तू मागे फिरशील का ?
आज तरी क्रांती साठी……
वामनाच्या भटक्या जाती
वाट फुटे तिकडे जाती
आतातरी या साऱ्याची उभी वसाहत तू करशील का ?
आज तरी क्रांतीसाठी वाट भीमाची तू धरशील का ?’
=====
काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने
आज मुजरे मला करती भीमाच्या प्रतापाने ….
गेली सारीच लाचारी आज दिल्लीच्या दरबारी
मला नेउन बसविले सात कोटीच्या बापाने….
मला चांभार बनविले एका काळ्या कसाबाने
का न कापावे मी त्याला एका रापीच्या कापाने…..
होतो मातीत दडलेला होतो मातीत पडलेला
माझे सोनेच केले रे एका मोठ्या सराफाने…..
काल जातीच्या सापाला ठेचले मी जरी
वामन काढला काढला रे फणा येथे त्याच जातीच्या सापाने..’
=========
नदीच्या वाट चून चून काट
चून चून करती पायी | पोर चालत राही || धृ ||
काडीला तान्ह डोहीवर दुडी | थरथर करी कवळी कुडी |
सांगायचा गुन्हा सांगाव कुन्हा | तशीच पाणी वाहि …|| १ ||
शेताच्यावट दोयीवर पाटी | पाटीत दही दुधाची वाटी |
सांडेल बाई वाकायचं नाही होई उन्हात ल्हायी ….|| २ ||
सांजच्या पारी गवताच्या भारा | ढवळ्या गायीला आणावा चारा |
ओझ्यानं राही वाकून जाई | तशीच ओझी वाहि || ३ ||
पहाटी उठ जात्याशी झठ | लगी निघावं नदीच्या वाट |
वामनच्या घरी कष्टच करी | गाडीची सुटका नाही || ४ ||
======
‘नदीच्या पल्हाड बाई , झाडी लई दाट
तिथूनच जाई माझ्या माहेरची वाट
ओलांडता झाडी , लागे रामाची टेकडी
दिसते तिथून माझ्या मामाची झोपडी
झोपडीपासून वाहे झुळझुळ पाट
राही बारमाही मळा मामाचा हिरवा
तापल्या जीवाला तिथ मिळतो गारवा
पुरवितो पाणी उभ्या पिकला रहाट
उतरतो शीण मुल मामाची पाहून
मामीच्या मायेत रात्र एखादी राहून
माहेरची ओढी लागे होताच पाहत
जाता जरा पुढे लागे भीमाचा शिवार
कसलेली शेती पीक देई दाणेदार
धान्यापारी ताठ उभी जोन्धाल्याची ताट …..’

प्रत्येक स्त्रीला माहेराची ओढ असणे जितके साहजिक असते तद्वतच तिला आपल्या सासरी आपल्या पतीचा सर्वात जास्त आधार वाटणे हे स्वाभाविक असते. मात्र तिच्या सासरी सारे काही आलबेल नसेल तर मात्र तिची अवस्था अत्यंत बिकट होते. तिच्या कष्टाला पारावार राहत नाही अन तिच्या दुर्दैवाचे दशावतार सुरु राहतात. अशा स्त्रीमनाचं अचूक वेध घेणारं चित्रण कर्डक आपल्या कवितेतून करतात.
‘वागने बाई नीट नाही भरताराची,
आईच्या घराची याद येई माहेराची
पति माला फटकेच देई

सासु बिचारी चट्केच देई
जाचणी जीवाला तीच नंदना, दिराची
पहाटी उठावे दळावं मळावं
कसं बसं शेताला पळावं
खणाची रताळी मीच, काळ्या वावराची
घरी मी करावं, दारी मी करावं
करावं तरी मी उपाशी मरावं
कुणा कीव नाही माझ्या अश्रूंच्या धारांची
पोटाला पुरेशी पेज तरी वामन
असावी सुखाची रोज तरी वामन
पाहतोच होळी तूच माझ्या संसाराची…’

====
‘पिऊ नका ही दारू र्र घरी उपाशी पारू र्र
तू सोडावं दारूला आता पोसावं पारूला
दारुवाल्या सरूला, तिच्या करू, नरूला
कमाई नको चारू र्र …
ती खेड्याची र्ऱ्हाणारी, जे दिल ते खाणारी
जीव जीवाला देणारी, नाव तुझ घेणारी
नको भुकेली मारू र्र ……..
तुला घरदार कळेना, तुला संसार कळेना
तुला मोटार कळेना, तुला गटार कळेना
पिऊन पडशील दारू र्र…..
तो वामन विचारी, रोज पारूला विचारी
तरी सांगंना बिचारी असा कसा तू कारू र्र ?’
====