वामनदादा कर्डक स्मृतिदिन (15 मे)

*लोकशाहिर महाकवी वामनदादा कर्डक स्म्रूतीदिन*
(१५ ऑगस्ट १९२२ – १५ मे २००४)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारावून गेलेला एक सच्चा अनुयायी, त्यांचे विचार आपल्या गीतांमधून व ओजस्वी वाणीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गांववाड्यांत, घराघरांत पोहचवत समाज जागृत करण्याचे कार्य वामनदादांनी शेवटपर्यंत केले.
अशा महापुरुषांच्या स्म्रूतींना फक्त स्म्रूतीदिनांपुरते आठवण न करता त्यांच्या स्म्रूतींना कायम उजाळत राहाव्यात,
यासाठी मुंबईचे उपनगर असणाऱ्या बदलापूर शहरातील एक स्वाभिमानी उद्योजक, बांधकाम व्यावसायिक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे शहराध्यक्ष
आयु. धनराज गायकवाड यांनी सामाजिक भान जपत आपल्या व्यवसायिक रहिवाशी संकुलाला ‘ महाकवी वामनदादा कर्डक पॅलेस’ नाव देऊन वामनदादांच्या स्म्रूती खऱ्या अर्थाने अजरामर केल्या आहेत.
मुंबईहून कर्जतच्या दिशेने येजा करणाऱ्या प्रत्येक उपनगरीय रेल्वेतून व पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने रेल्वेने प्रवास करताना किंवा रस्त्याने जात असताना वामनदादांचे नाव असणाऱ्या या इमारतीला पाहून प्रत्त्येक भिम अनुयायाची छाती अभिमानाने फुलून वामनदादांना आपसुकच अंत:करणातून अभिवादन होते आणि वामनदादांच्या गीताच्या त्या पंक्ती आठवतात,
“भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते,
तलवारीचे त्यांच्या न्यारेच टोक असते.
वाणीत भीम आहे, करणीत भीम असता,
वर्तन‌ तुझ्या पिलांचे सारेच चोख असते.”
🙏💐 लोकशाहीर महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्म्रूतींना अभिवादन! 💐🙏