शिक्षण व विद्या या गोष्टींशिवाय आपला उद्धार होणार नाही

“शिक्षण व विद्या या गोष्टींशिवाय आपला उद्धार होणार नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक कार्ये अंगीकारली. राजकारणात माझा विशेष महत्त्वाचा काळ गेला. सध्या राजकारणाच्या दोऱ्या उच्चवर्णीयांच्या हातात आहेत. त्या दोऱ्या तशाच हाती ठेवण्यासाठी उच्चवर्णीयांची धडपड चाललेली आहे. उच्च प्रतीच्या माऱ्याच्या जागा पटकावण्यासाठी जी विद्या पाहिजे ती अजून उच्चवर्णीयांखेरीज इतरांना प्राप्त झालेली नाही. “जिच्या हाती पाळण्याची दोरी…” असे काही म्हटले जाते, त्याचप्रमाणे राजकारणाच्या दोर्‍या विद्येशिवाय आपल्या हाती येणार नाहीत. राजकीय सत्ता हाती यावी म्हणून अनेकांनी प्रयत्न चालविले आहेत, पण त्यांना यश येत नाही. या तफावतीचे अधिष्ठान हेच आहे. इंजिनिअर, कलेक्टर वगैरे जागा फक्त उच्चवर्णीयांनाच शिक्षणामुळे मिळतात. शंभर पैकी जवळजवळ ९९ इंजिनिअर, ९९ कलेक्टर असे उच्चवर्णीयांचे असतात. त्यामुळे त्यांच्या हाताखालील जागा ते आपल्या लोकांना देत असतात.”

~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. १४ जानेवारी १९४८, धोबी तलाव नाईट स्कूल, मुंबई