सागर मनाचा जिथे शुद्ध आहे | Song Lyrics

श्रेणी माहिती
गीताचे नाव सागर मनाचा जिथे शुद्ध आहे
गीतकार (Lyricist) लोकशाहीर वामनदादा कर्डक
थीम / संदेश निर्मळ मन, करुणा व समतेच्या मार्गावर बुद्धत्वाचा उद्घोष
सागर मनाचा जिथे शुद्ध आहे
तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे
कुणी माणसाला इथे हीन लेखे
कुणी माणसाला इथे दीन लेखे
तरी समतेसाठी जिथे युद्ध आहे
तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे
महाकाळ आला तरीही पिलांना
पिलांच्या पिलांना, दिलाच्या दिलांना
भीमा माऊलीचे जिथे दुध आहे
तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे
खरी धम्मसेवा, खरी लोकसेवा
मिळे वामनाला तिच्यातून मेवा
जिथे सारी सेवा ही नमूद आहे
तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे
सागर मनाचा जिथे शुद्ध आहे
तिथे बुद्ध आहे, तिथे बुद्ध आहे