आरक्षण मुद्दे व खंडन – सागर बोरसे

प्रश्न १:- आज गरिबांना आरक्षण दिले पाहिजे न कि जातीला, आरक्षण जातीवरूनच का?
उत्तर :- भारतीय इतिहास पाहता गरिबीची मूळ कारणे जर शोधली तर ती होती जातीय व्यवस्था. जिथे शुद्र व अतिशूद्र जातींना कोणत्याही प्रकारचे कोणतेही सामाजिक, न्यायिक हक्क नव्हते. त्यांना फक्त सेवा देण्यासाठी वापरले जात असे. मग आता शुद्र कोण आणि अति शुद्र कोण ? तर शुद्र ते होते ज्यांच्याकडून सेवा करून घेताना स्पर्श झालाच तर चालून जायचा जसे शिंपी, लोहार, न्हावी. आणि अति शुद्र ते ज्यांचा स्पर्श कोणत्याही पद्धतीने समाजाला मान्य नव्हता. जर या देशात सामाजिक व्यवस्था उभी करताना हजारो वर्ष जात हाच मुद्दा महत्वाचा होता तेव्हा त्यांचा पुनर्वसनासाठी हि जात हाच मुद्दा महत्वाचा असायला हवा. जसे माझे डोळे हे प्रदुर्षानाने खराब झाले तर मी माझ्या डोळ्याची काळजी हि प्रदूषणापासूनच घ्यायला हवी तिथे दुसरा उपाय करून काही उपयोग होणार नाही.
प्रश्न २.:- ते काय आम्ही केले का, आमच्या पुर्वाज्यानी जी वागणूक दिली त्याला आम्ही जबाबदार का?
उत्तर :- जेव्हाही कधी आपण देश ह्या सनकल्पनेवर बोलतो तेव्हा आपला अभिमान हा कोणत्या गोष्टींवर असतो ? शून्याचा शोध कोणी लावला? वेदांमध्ये जे लिहील गेल आहे ते आज हि महानच आहे, आपल्या पूर्वज्यांनी हे शोधून काढल, ते शोधून काढल. बर आता ज्या इतिहासाच्या जोरावर हजारो वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टींचा आज अभिमान आहे त्याच इतिहासात कोणावर तरी अन्याय झाला तो का म्हणून मान्य नाही करायचा? जर आपण, आपल्या सगळ्याचा त्या इतिहासाला सोनेरी इतिहास म्हणतो तर त्या इतिहासाचा शुद्र अतिशूद्र भागच नव्हती का ? तर मग आपण एकत्र साराच इतिहास आपला नाही म्हणू किंवा साराच आपला आहे म्हणून ज्यांचावर अन्याय झाला त्यांना सोबत घेऊन चालू
प्रश्न ३ :- आम्ही कित्येक मुले पहिली जी श्रीमंत घरातून येउन आरक्षणाचा लाभ घेतात मग आम्हीच का फी भरायची?
उत्तर :- सगळ्यात पहिला मुद्दा कि कोणत्या कास्ट मधली किती लोक काय काम करतात यावर हे आर्थिक गणित अवलंबून असत. भारत सरकारच्या २०११ च्या रिपोर्ट प्रमाणे भारतात सगळ्याच कमी उत्पन्न हे रोजगारी म्हणजे रोजच्या रोज काम करणाऱ्या लोकांचे आहे ज्यांना महिना ५००० पेक्षा कमी पगार मिळतो तर या कामगार वर्गात सगळ्यात जास्त टक्केवारी हि दलितांची येते. आता सरकारच्याच रिपोर्ट प्रमाणे भारतात बिगरशेती घरे किती आहेत? म्हणजे ज्यांचाकडे कसायला स्वतःची जमीन नाही असे, तर हा टक्का आहे ऐकून जनसंखेच्या ५६. ४१%. आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात हि सगळ्यात जास्त टक्केवारी पुन्हा येते दलितांचीच. मग जेव्हा कोणत्याही गोष्टीचा हिशोब केला जातो तेव्हा आपण त्याचा average काढून करतो. तरीही जर एखाद्याने आरक्षण घेऊन दाखला घेतलाच असेल तर त्याला फी माफी मिळत नाही फी हि त्याचा पालकांच्या उत्पनावरती ठरते.
प्रश्न ४ :- देश्यात शाळेत, नौकरीला आरक्षण मागता ,मग सैन्यात मागा ना तिथे का नाही?
उत्तर :- शैक्षणिक व राजकीय आरक्षणा आधीच सैन्यात आरक्षण लागू करून दिल होत. महार बाटलीन हि एक पायदळ तुकडी आहे भारतीय सैन्यात ज्यामध्ये ए सी च्या लोकांना आरक्षण आहे आणि हि तुकडी front-liner आहे म्हणजे जेव्हा कधी युद्ध होत जेव्हा हे पायदळ सुरुवातीला लढायला जात.
व यावयतिरिकत पहीले ” चर्मकार रेजिमेंट ” पण होती त्याची शौर्यगाथा वाचा व पहा
या व्यतिरिक्त शिख रेजिमेंट यात मिरासी शीख व मजहबी शीख ( Schedule Caste ) यांचा पण समावेश आहे त्यांची शौर्यगाथा नंतर दुसर्या Post ला सांगेन
प्रश्न ५ :- बाबासाहेबांनी आरक्षण हे फक्त १० वर्षासाठी दिले होते, मग ते अजून का चालू?
उत्तर :- बाबासाहेबांनी आरक्षण हे दहा वर्षासाठी मान्य केले होत ते आरक्षण होत राजकीय आरक्षण. इथे मात्र बाबासाहेबाच्या नावाचा खूप सुंदर वापर केला जातो एकीकडे बाबासाहेबांनी एकट्याने कुठे कायदा लिहिला असा गवगवा केला जातो न एकीकडे आरक्षण मात्र फक्त त्यांनीच दिल अस सांगितलं जात. हो आम्हाला मान्य आहे बाबासाहेबही खूप कष्टाने हे आरक्षण मिळवून दिल होत. मग जर हे आरक्षणदहा वर्षासाठी होत तर अजून कस सुरु? तर राजकीय आरक्षण हे एका खूप छोट्याश्या गोष्टीवर अवलंबून आहे ती गोष्ट म्हणजे किती दलित उमेदवार हे खुल्या जागेवरून निवडून येतात जेव्हा ते खुल्या जागेवरून त्यांच्या जनगणनेच्या बरोबरीने निवडून येतील तेव्हा हे आरक्षण बंद केल जाईल. आता मुद्दा शैक्षणिक आरक्षणाचा बाबासाहेबांचे महानिर्वाण १९५६ सालचे आहे. शिक्षणातिल आरक्षण १९८२ सालचे आहे . ज्याप्रमाणे राजकीय आरक्षणाचि दर दहा वर्षांनी वैधता तपासली जाते त्याप्रमाणेच शैक्षणिक आरक्षणाचि दर पाच वर्षांनी वैधता तपासली जाते. ते वैध असते म्हणून दिले जाते. –
प्रश्न ६ :- क्रिमी लेयर फक्त ओबिसिना का ? (माझ्या अनेक ओबीसी मित्रांचा प्रश्न, कि आम्ही आरक्षण तर घेतो पण मग आम्हाला फी का जास्त? )
उत्तर :- ओबीसी आणि एस सी या दोन्ही आरक्षणाचे हेतू भिन्न आहेत . ओबिसिना (आसाशै ) आणि एससी ना अस्पृश्यता आणि शोषण याविरुद्ध आरक्षण आहे .
१) ओबीसी आरक्षण हे प्रामुख्याने (आसाशै ) आर्थिक/सामजिक /शैक्षणिक मागास जातीना दिले आहे. (मंडल आयोग क्रायटेरिया ) माळी , साळी, कोळी, सुतार, दैवज्ञ ब्राम्हण अशा बारा बलुतेदार जाती ओबीसीत येतात. यांचे (आसाशै ) उत्थान झाले कि क्रिमी लेयर लावून वगळता येते. कारण ज्या क्रायटेरियावर आरक्षण दिले आहे – त्याची पूर्तता होते
२) एससी / एस टी चे आरक्षण हे पूर्व अस्पृश्य शोषित आणि दुर्लक्षित जातीना आहे. यात नवबौद्ध , महार , मांग , चांभार, ढोर , आदिवासी या जाती येतात त्यांचे (आसाशै ) उत्थान झाले तरी इतरांच्या (मनातली ) अस्पृश्यता – शोषण आणि हलके मानले जाणे संपत नाही – भेदभाव तसाच राहतो – म्हणून एससी / एस टी ला (आसाशै ) क्रिमी लेयर लावता येत नाही . यावर यदी फ़डकेंच्या “खरी हि न्यायाची रीती” या पुस्तकात विस्तृत विवेचन आहे.
प्रश्न ७:- आरक्षणामुळे ज्यांची गुणवत्ता नाही त्यांना काम मिळते व गुणवत्ता असलेले मात्र देश सोडून जातात .
परवाच माझ्या एका मित्राने पोस्ट केली होती कि, ज्या देशात आरक्षणाने शिक्षण मिळते तिथे पूल पडणारच ना. बर तो पूल बांधणारी कंपनी होती खाजगी आणि कोणत्याही खाजगी कंपनीत कोणताही आरक्षण नसते. नौकरीत आरक्षण फक्त आणि फक्त सरकारी जागेसाठी आहे. आता देशातील एकूण रोजगारपैकी फक्त ३ % रोजगार हे सरकारी आहेत म्हणजे फक्त ३ % जागांवर किंवा रोजगारावर आरक्षण लागू आहे. आता म्हणजे ४९% आरक्षण फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात ते आलेलच नाही. सरकारी राखीव जागांचा अनुशेष भरून काढणे अजून बाकी आहे म्हणजे ज्या जागा सरकार भरून काढत आहे त्या नवीन जागा नसून ह्या आरक्षण लागू झाल्या पासून भरल्या गेलेल्याच नाही . मग ओपन मधून सुद्धा लोकसंखेच्या प्रमाणात दलित – मागास जेव्हा भारती होतील – तेव्हा आरक्षणाचि गरज संपते
प्रश्न ८ :- (हा प्रश्न खर तर खूप भावनिक आहे ) जर आज ज्यांना हे आरक्षण मिळत त्यांचे आरक्षण काढून घेऊन ज्यांना नाही मिळत त्यांना दिले तर काय वाटेल तुला?
उत्तर :- मित्र मी आनदाने स्वीकारेल पण हे सगळ्याच बाबतीत झाल पाहिजे म्हणजे जे आरक्षण घेत आहेत त्यांच आरक्षण अनारक्षित लोकांना व जी साधन सामग्री, घर, शेती पैसा हा अनारक्षित लोकांकडे आहे ती सारी आरक्षित लोकांना.
प्रश्न ९ :- आज कुठे शिल्लक आहे जात ?
उत्तर : ह्या प्रश्नच उत्तर मी नाही तुमचा whats app देईल. एकदा फक्त तुमचे ग्रुप चाळा ज्यांचाकडे एकही ग्रुप जातीवरून नाही त्यांनी मग जात संपली अस जाहीर करा एकीकडे मी जात नही म्हणतो आणि दुसरीकडे जातीचे गोळा करून दुसर्यांना शिव्या देत राहतो . हेच खरे आहे
प्रश्न 10 : – आम्ही TAX भरतो तो देशासाठी तर तो तुमचावर का खर्च करावा
उत्तर : भारतात Regressive tax प्रणाली आहे.
भारतामध्ये direct tax मधुन मिळनारा कर हा केवळ 35% आहे
आणि indirect tax मधुन मिळनारा कर हा 65% आहे
म्हणजेच 65% येणार्या करामध्ये सर्वाधिक वाटा हा Reserved category आणि धार्मिक अल्पसंख्याक यांचा आहे
कारण त्यांची लोकसंख्या 100% पैकि 83.36% येवढी आहे.
2011 च्या जनगणनेनुसार भारताची
category निहाय जनगनना.
OBC 40.94%
SC 19.59%
ST 8.6
Minorities 14.23%
____________________
Total 83.36%
अर्थात 108 करोड लोकसंख्या हि
Reserved category आणि धार्मिक अल्पसंख्याक यांची आहे..
GST हा indirect tax आहे म्हणजेच consumption tax आहे आणि GSt मार्फत सर्वाधिक कर हा भारत आणि राज्य सरकार ला मिळतो…
तो कर जर category मध्ये devide केला तर अर्थातच 83.36% लोक हा कर General category च्या 16.64% लोकसंख्येच्या तुलनेने
जास्त भरतात.
भारतामध्ये direct tax हा Regressive Tax असल्या कारनाने आणि त्याचे एकुन करा मध्ये contribution केवळ 35% असल्या कारणाने
General category व तथाकथीत स्वतःला forward समजनारे भांडवलदार लोक यांना
उलट
tax relief मिळतो म्हणून श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत आहे आणि गरबी हा गरीबच रहात आहे.
तर तथाकथीत forward आणि General Category च्या लोकांनी आधी भारताची कर प्राणाली समजुन घ्यावी आणि मग Reserved category च्या पैश्यातुन त्यांनाच मिळनार्या Reservation सवलती वरती टिका टिप्पणी करावी.. ( only This answer by Kiran Chavan )
प्रश्न 11 : – OK तर मग मला सांगा ना की आरक्षणामुळे देशाची प्रगती होत नाही यावर काय सांगणार आपण ?
उत्तर : 1 ) भारत कधी एक देश होता ?
2 ) तसेच भारतात कधी समता स्वातंत्र्य व बंधुता होती ?
3 )जो देश कधी अखंड नव्हता तो तुटणारच कसा ?
4 ) १९५० पुर्वी तर भारतात आरक्षण नव्हते तरीही देश हजार वर्षे परकीयांच्या गुलामीत का गेला ?
5 ) आरक्षण नसतानाही भारत देश निरक्षरता आणि द्रारिद्र्यात का अडकुन पडला ?
6 ) आरक्षण नसताना भारत विश्वगुरु किंवा महासत्ता का बनला नाही ?
7 ) आरक्षण नसताना या तथाकथित बुद्धिवादी लोकांनी काय दिवे लावले ?
8 ) बर स्वातंत्र्यापुर्वी ८०० वर्षे कोणत्याही प्रकारचे आरक्षण नसतानाही भारत गुलामीत गेला . कोणतेही मुलभुत संशोधन येथे झाले नाही , औद्योगिक क्रांतीही झाली नाही की भारत महासत्ताही का बनला नाही ?
9 ) मग ज्यावेळेस आरक्षण नावाचा प्रकार नव्हता तेव्हा तथाकथित मेरीटधारी लोकांनी देशासाठी काय योगदान दिले ? उलट शक हुण मुघल डच फ्रेंच पोर्तुगीज व ब्रिटिश या सारख्या परकीय सत्तेला बळी पडले
मग प्रश्न पडतो की तेव्हा हे तथाकथित गुणवत्तारी कुठे होते
म्हणुनच आरक्षणामुळे देशाची प्रगती होत नाही या मुद्द्याला काहीही अर्थ राहत नाही
प्रश्न 12 : – बर आरक्षण घेवुन बसलेले इंजिनिअर डाॅकटर अकुशल असतात व चुका करतात
उत्तर : हा केवळ एक गैरसमज आहे हे काही ठराविक लोकांनी पसरवलेला भ्रम आहे ज्यात काहीही तथ्य नाही यालाच ” गोबेलस निती ” म्हणतात
याला पुरावा म्हणून मी तुम्हाला सर्व आकडेवारी असणारी Video देतो
प्रश्न 13 – आरक्षण संपवून समानता हवी आहे ” समान नागरी कायदा “
उत्तर – पहीली बाब तर ही आहे की भारतात ” कायदयापुढे सर्व समान आहेत ” हिच समानता आहे व आरक्षण हा एक वंचित घटक यांचा विकास करण्याचे साधन आहे हा कायदा जवळपास सर्व देशात आहे
पण तरी मी तुमचा समाधाना साठी तुमची So called समानता पण सांगतो व त्याच उत्तर ही
खरोखर आरक्षण संपवून समानता येत असेल तर खुशाल आरक्षण संपवाव त्याच बरोबर
i )शासनाने सर्व शेत जमिनी आपल्या ताब्यात घेऊन त्या शेत जमिनीचं वितरण सर्व जाती जातीत समान प्रमाणे करावे.
ii )सर्व जातीयता नष्ट करून फक्त एकच जात ठेवावी ती म्हणजेच भारतीय आणि सर्व जाती जातीत रोटी व्यवहार व बेटी व्यवहार व्हायला पाहीजे म्हणजे उगाच नितीन आगे सारख्या निरापराध मुलाचा बळी जायला नको.
iii )कोणत्याच जातील मी मोठा आसा फुकटचा माज नको म्हणजेच खैरलांजी सारख कुठलं अक्ख कुटुंब उद्धवस्त होणार नाही
iv ) सर्व साखर कारखाने सूट गिरण्या सरकारने ताब्यात घेऊन ते चालवावेत
v ) सर्व खाजगी शाळा बंद करून सर्वांची मुल सरकारी शाळेतच शिकली पाहिजे म्हणजेच सर्वाना शिक्षणाची समान संधी मिळेल
vi ) शंकराचार्य व मंदिरातील पुजारी पदावर सर्व जाती धर्मातील लोकांना संधी मिळावी अश्या प्रकारे सर्व जातीयता नष्ट करा मग अपोआप समानता प्रस्थापित होऊन सर्वाना समान संधी मिळतील
vii ) चीन मधील ” जमीन सरकारी तत्व प्रमाणे समान वाटप ” हा pattern वापरावा ( चीन आर्थिक धोरण 1948 )
प्रश्न 14 ) भारत सोडुन इतर कुठल्याही देशात आरक्षण नाही आहे त्यामुळे ते देश प्रगत होत आहे
उत्तर – तुमच हे विधान खुप अज्ञानता पुर्वक आहे कारण मी तुला त्या सर्व देशाची यादी देतो ज्यात आरक्षणाची तरतूद आहे
(Reservation/Affirmative Action):-
1. आपला शेजारील देश पाकिस्तान तिथ 5% दलित हिंदू शिख आहेत पण त्यांनी ईमानदारी ने 6% आरक्षण दिल आहे व खासकरून म्हणजे ते याचा विरोध पण करत नाही
2. दक्षिण अफ्रीका टीम मध्ये 4 अश्वेत खेळाडू असतात व त्याचा सर्व सरकारी विभागात पण काही जागा राखीव असतात
3. Superpower अमेरिका या देशात affirmative action या act प्रमाणे Native American , Jewish व Black community ला
आरक्षण मिळत तेथील चित्रपटात पण आरक्षण निर्धारित आहे अमेरिका ने तर आज से 155 साल आधी 4 मार्च, 1861 अब्राहम लिंकन जे चर्मकार चे काम करायचे त्याला President बनवल आणि आपल्या येथे माझझी हे मुख्यमंत्री बनले बिहारचे तरी कीती जळफळाट झाला ना बर अमेरिकेत अजुन वैशिष्ट्य म्हणजे तिथ Private Sector ला पण आरक्षण आहे यावयतिरिकत तिथ ” Black Churches ” पण आहे खास काळ्या लोकांचा विकासासाठि ते धार्मिक बाबीवरूनही मदत करतात http://en.wikipedia.org/wiki/Black_church
आपल्याकडे तर मंदिरात पण जात पाहुन प्रवेश देतात आपल्याकडे ते नाही आहे तरी कीती रडगाण एकीकडे तुम्ही अमेरिकेच गुणगाण गातात व त्याचे हे अनुकरण करायला लावले की लगेच मैदान सोडतात हे ” डबल ढोलकी ” विधान आहे
4. ब्राझील मधील आरक्षण ” Vestibular ” ह्या नावाने आहे
5. कनाडा येथे ” समान रोजगार तत्व ” आहे ज्याचा फायदा तेथील असामान्य व अल्पसंख्यक ना मिळतो
6. चीन मध्ये महिला व तात्विक अल्पसंख्यक यांना आरक्षण आहे
7. फिनलैंड या देशात स्वीडीश लोकांना आरक्षण आहे
8. जर्मनी विसरला का आपल्या येथे भरपुर लोकांनाच तो तथाकथित राष्ट्रवादला आपला आदर्श मानतात व हिटलरला पण बर त्या देशातही ” जिमनॅशियम सिस्टम ” नावाने आरक्षण आहे
9. इसरायल या Affirmative Action प्रमाणे आरक्षण आहे (See detail https://en.wikipedia.org/wiki/Affirmative_action )
10. जापान आठवतो का दुसर्या महायुद्धात बेचिराख झालेला देश नंतर प्रगतिशिल बनला त्या देशात पण ” बुराकूमिन ” या लोकासाठी आरक्षण आहे
11. मॅसेडोनिया या देशात ” अल्बानियन ” या घटकासाठी आरक्षण आहे
12. मलेशियात ” नवीन आर्थिक योजना ” प्रमाणे तेथील वंचित घटकांसाठी आरक्षण आहे
13. न्यूजीलैंड या देशात ” माओरिस व पॉलिनेशियन ” या घटकांसाठी ” Affirmative Action ” अर्थात आरक्षण आहे
14. नॉर्वे या देशात ” पीसीएल बोर्ड ” यात 40 % महिलांसाठी आरक्षण आहे
15. रोमानिया या देशात शोषित लोकांसाठी आरक्षण आहे
16. दक्षिण आफ्रिका यात ” रोजगार समता ( काळे गोरे लोकांसाठी समान रोजगार ) ” आरक्षण आहे
17. दक्षिण कोरिया येथे उत्तरी कोरिया व चीनी लोकांसाठी आरक्षण आहे
18. श्रीलंका या देशात तामिळ व क्रिश्चियन लोकांसाठी आरक्षण आहे
19. स्वीडन या देशात ” General Affirmative Action ” याप्रमाणे आरक्षण आहे
प्रश्न 15 ) पण आरक्षण हे हिंदू दलित यांनाच हवे धर्मतरिंत लोकांना का ? ते तर घटनाबाह्य आहे
उत्तर – आजिबात घटनाबाह्य नाही कारण भारतात दलित हा काय धर्म परिवर्तन करून तथाकथित सवर्ण होत नाही दलित Christians व मिरासी शीख व मजहबी शीख यांनाही आरक्षण मिळते ते पण का यासाठी पुढील link वर Click करावे आपण
16 ) सर्वात शेवटी काही महत्वाचे मुद्दे
आरक्षणांतर्गत आरक्षण
==============
A – SC ST साठी येथील जनतेने कोणताही त्याग केलेला नाही.
B – SC ST यांना नैसर्गिक साधन संपत्तीमधे कुठलाही वाटा दिलेला नाही. परंपरागत रोजगारात वाटा नाही.
C – पाकिस्तानप्रमाणे स्वतंत्र देश नाही.
D – पाकिस्तानला रिझर्व्ह बॅंकेच्या गंगाजळीतून लोकसंख्येच्या प्रमाणात ७५ कोटी रूपये त्या वेळी दिले गेले. अशी रक्कम SC ST यांना दिलेली नाही.
E – या सर्व पार्श्वभूमीवर आरक्षण हे प्रतिनिधित्व म्हणून दिलेले आहे.
F – सेपरेट सेटलमेंटचा प्रयत्न केवळ ब्रिटीश सरकार बदलल्याने विफल झाला. परंतु तिसरा पक्ष म्हणून अस्पृश्यांना स्थान मिळाल्याने त्यांच्याशिवाय संविधान बनू शकत नव्हते. यामुळे आरक्षण देण्यात भारतीय समाजाने कुठलेही उपकार केलेले नाहीत.
G – त्यामुळे आरक्षण कसे असावे हे सांगण्य़ाचा इतरांना काडीचाही अधिकार नाही.
H – आरक्षण लागू झाले तेव्हां आता प्रगत असलेल्या जातींमधल्या लोकांचे काका मामा सरकार किंवा प्रशासनात बसलेले नव्हते.
I – स्वातंत्र्ययुद्धात ज्यांनी हिरीरीने सहभाग घेतला ते लवकर जागृत झाले, त्यांच्यात लवकर अस्मिता जागृत झाली. यात त्यांचा कसलाही दोष नाही.
J – आरक्षण कधीही पूर्णपणे भरण्यात आलेले नाही. प्रत्येक वेळी रिक्त जागा असत. त्याचा बॅकलॉग साठून राहत असे. त्यासाठी जागृत जातीच लढा देत असे.
K – ज्या जातींना अन्याय झाला असे वाटते त्यांनी या रिक्त जागांवर क्लेम केला नाही ही वस्तुस्थिती आहे.
L – आरक्षण हे मा-याच्या जागा काबीज करण्याचे साधन देखील आहे. पहिल्या पिढीत क्लास फोर, दुस-या पिढीत क्लास थ्री अशी वाटचाल राहीलेली आहे.
M – आता जेव्हां मा-याच्या जागा काबीज करायची वेळ आली ती या दोन पिढ्यांच्या घरातच असणार आहे. त्यामुळे हे हाणून पाडण्यासाठी खाजगीकरण केले गेले. त्यात जवळपास दोन कोटी रोजगार सरकारी क्षेत्रातून संपवला गेला.
N – निमसरकारी आणि उपक्रम हे विचारात घेतला तर हे प्रमाण प्रचंड आहे. म्हणजेच आज एक कोटी पूर्वास्पृश्य जातींना रोजगार मिळाला असता त्याऐवजी आज १२७ कोटी लोकसंख्येत फक्त ३० लाख लोक सरकारी नोकरीत आहेत.
O – एकूण ९७% रोजगार हा खासगी क्षेत्रात आहे. त्यातील ५३% कृषी क्षेत्रात आहे. कृषी क्षेत्रात अस्पृश्यांचे प्रमाण नगण्य आहे.
P – यावर उपाय खाजगी क्षेत्रात आरक्षण हा आहे.
Q – किंवा जमिनींचे फेरवाटप हा प्रभावी उपाय आहे.
R – अथवा सेवा क्षेत्रातील उद्योगात आरक्षण आणि बीजभांडवलासहीत कर्ज असे उपाय योजले पाहीजेता.
S – अनुसूचित जाती व जमाती या लेबलमुळे देशातील साडेतीन हजार जातींमधे बंधुभाव निर्माण होतो.
T – त्या बंधूभावामुळे संपूर्ण देशात अनुसूचित जाती व जमाती असा एक वर्ग निर्माण झाला.
U – या वर्गाची शासक होण्याची शक्यता वाढली.
V – आरक्षणांतर्गत आरक्षणामुळे फाटाफूट होऊन प्रस्थापितांकडे सत्ता कायम राहील याची दक्षता घेतली जाईल.
W – पूर्वास्पृश्य व मागासवर्गीय जातीतील ॲकेडेमिक विद्वान देखील या खेळीला बळी पडत आहेत.
X – सनातनी छावणीतून सातत्याने अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यात फूट पाडण्य़ाच्या कारस्थानातील हे एक कारस्थान आहे.
Y – भाबडेपणाने किंवा आपली स्वत:ची इमेज उदात्त करण्याच्या प्रयत्नात आपण आपल्य़ा भविष्याला नख तर लावत नाही ना याचा एकवार विचार झाला पाहीजे.
Z – असे निर्णय बसून विचार विनिमय करून व्हायला हवेत. कुणाच्या इच्छेखातर नकोत.
Post By सागर बोरसे
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?