पाली पाठ ३

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_पाली पाठ_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

*_!! भाग ३ !!_*

*_सूचना :-  आपण सर्वांनी “पाली भाषेचा” अभ्यास करावा आणि आपल्या जवळील विद्यापीठात “पाली भाषा” शिकण्यासाठी प्रवेश घ्यावा ह्या उद्देशाने सदर सत्र हे काही मोजकेच दिवस सुरू करण्यात येत आहे._*

*_शब्द_*

अज्झत्तं – स्वताशी, व्यक्तिगत.

अधिगतो – प्राप्त केले.

अनसवं – विकारमुक्त.

अपरं – दुसरा, अन्य

एकाकिनी – एकटिच.

एकमन्तं – एका बाजुला.

ओकम्म – दूर होऊन, बाजुला होऊन.

ओरूहति – वरून खाली उतरणे.

ओमान – निंदा, अपमान.

ओपम्मं – उपमा, तुलना, रुपक, सारखेपणा.

कण्डु – खाज.

कटुक – कडु

कणेरिक – झोपडी.

कणेरू – हत्तीचे लहान पिल्लू.

किच्चं – काम, कार्य, व्यवसाय.

गोणो – बैल.

गोपुरं – दरवाजा, नगर, मनोरा.

गोरसो – दूध, गोळो–चेंडू

घट – घागर.

घतं – तुप.घायति–सुंघतो,

चोरेति – चोरतो.

चोळक – फाटलेले कापड.

जीवी – जगणारा.

जेट्ठभातु – मोठा भाऊ.

तन्दित – थकलेला, सुस्त

तथभावो – वास्तविकता.

दुरागत – वाईट, अप्रिय.

पच्चयो – हेतू, कारण, आधार

पण्डरो – पांढरा, शुभर.

पुप्फगन्ध – फुलाचा सुगंध.

मस्सु – मिशा.

रोचेति – आवडने, पसंत करणे

विलीनो – मिसळलेला

संसयो – संशय, शंका.

सम्भीत – घाबरलेला.

सीरो – नांगर.

सेखो – शिकत असलेला.

सुदक – स्वंयपाकी.

*_वाक्य_*

_*१) यं मया पस्सितं तं त्वया सुणितं* – जे  मी पाहिले आहे तेच तू ऐकले आहे._

_*२)  समरङ्गानं गच्छन्तानं सेनापतीनं जयो भयेय्य * – रणभूमीवर जाणाऱ्या सेनापती चे जय हो._

_*३) सावकेहि धम्मो सोतब्बो* – सावकाच्याव्दारा धम्म ऐकला गेला पाहिजे._

_*४) आकास्मा पतिता वुट्ठि खेत्तं पूरेन्तो तळागं पूरेसि* – आकाशातून पडलेल्या पावसाने शेतातील तलाव भरले आहेत._

_*५) दिल्लियं अच्चतं सीतलता अत्थि* – दिल्लीमधे अधिकतर शीतलता आहे._

_*६) नदी एवं सन्दति* – नदी अशीच वाहत असते._

_*७) तरूणियासध्दिं तारका गच्छन्ति।* – तरूणींसोबत तारका जातात._

_*८) इत्थियो विहार गच्छन्ति।* – स्त्री या विहारात जातात._

_*९) उम्मत्तका जना वारुणीं पिबन्ति।* – बेहोष लोक दारू पितात._

_*१०) भिक्खू नज्जा तीरे विहरति।* – भिक्खू नदीकाठी रहातात._

*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*

*_!! ओम मणी पद्मे हूँ !!_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 

*_संकलन – महेश कांबळे_*

*_दिनांक :- २१/०२/२०२४_*

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼