माणसा इथे मी तुझे गीत गावे | Manasa Ithe Tujhe Geet Gave song lyrics

 सादरकर्ता (Singer/Presenter)  ~लोकशाहीर वामनदादा कर्डक

माणसा इथे मी तुझे गीत गावे

असे गीत गावे तुझे हित व्हावे

असे तुझे माझे नाते जडावे

तुझ्या संकटाशी इथे मी लढावे II१II

तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे

तुझे दुःख सारे गळुनी पडावे II२II

एकाने हसावे लाखाने रडावे

असे विश्व आता इथे न उरावे II३II

इथे सारे सारे नवे पेरताना

वामनपरी मी तुझे हात व्हावे II४II

माणसा तुझे मी इथे गीत गावे

असे गीत गावे तुझे हित व्हावे…