Mahadnyanachya mahamanavala song lyrics | महाज्ञानाच्या महा मानवाला भीमगीत

महाज्ञानाच्या महामानवाला
थोर त्यागी त्या पुज्ज गौतमाला
वंदीतो सवे भीमाला
वंदीतो बुद्ध भीमाला

दुक्खिजीवा ज्ञान दीप हवा
असा हा धम्मदिवा प्रकाश देई नवा
मार्ग सत्याचा दावितो आम्हाला
थोर त्यागी त्या पुज्ज गौतमाला
वंदीतो सवे भीमाला
वंदीतो बुद्ध भीमाला

बडे बडे मिरविती चोहीकडे
माझ्या भीमाच्या पुढे आज ते फिके पडे
पाहुणी त्यांच्या त्या परिश्रमाला
थोर त्यागी त्या पुज्ज गौतमाला
वंदीतो सवे भीमाला
वंदीतो बुद्ध भीमाला

जातीयता होती जुलमी सत्ता
माझ्या भीमाने स्वतः तिची पेटवली चिता
रूढी थरथरली त्या पराक्रमाला
थोर त्यागी त्या पुज्ज गौतमाला
वंदीतो सवे भीमाला
वंदीतो बुद्ध भीमाला

जिथे तिथे गाऊन धम्म गीते
रांगन भरतो रिते तो हरिनंद इथे
शरण जाऊन त्या बुद्ध धम्माला
थोर त्यागी त्या पुज्ज गौतमाला
वंदीतो सवे भीमाला
वंदीतो बुद्ध भीमाला

महाज्ञानाच्या महामानवाला
थोर त्यागी त्या पुज्ज गौतमाला
वंदीतो सवे भीमाला
वंदीतो बुद्ध भीमाला

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?