गीतकार : सुनील खरे
गायक : मिलिंद शिंदे
संगीत : मिलिंद शिंदे
लेबल : स्वरांजली शिंदे
कोटी देवा मधला ना तो देव पावला,
संकटात आमच्या नाही देव धावला
ना रखवाला झाला मांगा महाराचा
आमच्या साठी तो लढला भिवा, लेक सुभेदाराचा ।।२।।
आमच्या साठी तो लढला भिवा, लेक सुभेदाराचा ।।२।।
३३ कोटी ते देव सारे बलवान
कुणाच्या हाती गदा, कुणाच्या हाती बाण
कुणीच नाही केलं रुढीला ते आव्हान
बहुजनांची तरी कुणी केली नाही जाण
काही बोललो तर छाटायचे जीभ रे
घाली कानामध्ये लाल लाल शीघ रे
ना दिसला देव रणी प्रतिकाराचा
आमच्या साठी तो लढला भिवा, लेक सुभेदाराचा ।।२।।
आमच्या साठी तो लढला भिवा, लेक सुभेदाराचा ।।२।।
युगा युगात आम्ही पाहिला किती त्रास
आमच्याच घरामध्ये आम्हाला बनविले दास
मनुच्या पिंजऱ्यामध्ये कोंडला किती श्वास
चाबकानं फोडलं र फाडलं किती मास
पोटी भीमाईच्या चौदाव लाल
एकटा भिडला बघा बिना हत्याराचा
आमच्या साठी तो लढला भिवा, लेक सुभेदाराचा ।।२।।
आमच्या साठी तो लढला भिवा, लेक सुभेदाराचा ।।२।।
कुण्या देवानं नाही झाडू सोडला आमचा
काढून गळ्यातील मठ फोडला आमचा
मायेच्या पोटी नाही हात ओढला आमचा
अस्पृशाचा टिळा माथी फोडला आमचा
काय कामाचा देव नुसता फुल हाताचा
आमच्या साठी तो लढला भिवा, लेक सुभेदाराचा ।।२।।
आमच्या साठी तो लढला भिवा, लेक सुभेदाराचा ।।२।।
पेनाचे शस्त्र केले केले ज्ञानाची केली ढाल
समाजासाठी सुनील पहिले किती हाल
गमविले मातीत बोट ते जरी लाल
मनुवाद्यांचं तोंड केलं रे त्यानं काळ
३३ कोटीहून एकच भारी शस्त्र भल्यापेक्षा विनाशस्त्र भारी
भीम भगवान झाला आमच्या उध्दाराचा
आमच्या साठी तो लढला भिवा, लेक सुभेदाराचा ।।२।।
आमच्या साठी तो लढला भिवा, लेक सुभेदाराचा ।।२।।
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.