-
Singer: Milind Shinde
-
Lyricist: Sanjay Waghchaure
-
Composer: Pralhad Shinde
-
Album: Soniyachi Ugavali Sakaal
-
भावार्थ: उच्च शिक्षण/पदवी मिळाली तरी माणुसकी, साधेपणा, आदर्श आणि साधेच जीवन टिकवले पाहिजे—या गीताची प्रेरणादायी ओळख आहे.
जरी झाला जरी झाला बॅरिस्टर तरी पडला ना ईसर
भीम आवडीन बाई खाई कांदा न भाकर
नको पुरणाची पोळी अन गोडधोड खाया
वाटू लसणाची चटणी संग तोंडी लावाया
तो अति आनंदानं बाई जेवल पोटभर
भीम आवडीन बाई खाई कांदा न भाकर
चिकनं चोपड खायाचा नाही भीमाला शोक
या समाज सेवेची त्याला लागलिया भूक
पंचपकवान स्वादिष्ट ना जेवला वेळेवर
भीम आवडीन बाई खाई कांदा न भाकर
त्या गोर्या साईबाचा होता गुलामाला धाक
पण बाबासाहेबांनी कापल गुलामीच नाक
मस्का स्लाईच बुरून पाव त्यांन्ना मारीली ठोकर
भीम आवडीन बाई खाई कांदा न भाकर
आडातल भरलाय त्या गडी संजयानी
तांब्या भरून देऊ त्याला माठातल पाणी
हे जेवण जिरवाया टाकू दुधात साखर
भीम आवडीन बाई खाई कांदा न भाकर
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.


