| घटक | माहिती |
|---|---|
| Singer | Vaibhav Khune |
| Lyricist | Sandeep Shinde |
| Music By | Milind Mohite |
| Album / Single | Asudya Kal Mani – Single |
| Lyrics Source | marathi.brambedkar.in |
भारी सोन्याहुनी कुंकवाच धनी
नको मला दाग दागीने
असु द्या काळं मनी ।।२।।
नका सांगु कौतुक दाग दागिन्यांचं
आहे का जगात नाव तुमच्या धन्याचं ।।२।।
भाग्यवान माझ्यावानी नाही कुणी
नको मला दाग दागीने
असु द्या काळं मनी ।।२।।
फाटक्याच साडीत आनंदानं राहीन
साहेबांना मात्र सुटा बुटात मी पाहीन
साडी जरी जुनी हिच माझी पैठणी
नको मला दाग दागीने
असु द्या काळं मनी ।।२।।
तेज सूर्याचं आहे कुंकाच्या टिळ्यात
रत्न भारताचं आहे माझ्या गळ्यात
लाजते गं सौभाग्य पाहुनी
नको मला दाग दागीने
असु द्या काळं मनी ।।२।।
धन दौलत तुमची येईल जाईल
कीर्ती या जगा मध्ये ग कायमची राहील
संदीप हे गुण गाई मनापासूनी
नको मला दाग दागीने
असु द्या काळं मनी ।।२।।


