आपला उद्धार करायला आपणच कंबर कसली पाहिजे

मुंबई- चिराबझार येथे 4 जून 1927 रोजी रात्री साडेआठ वाजता बहिष्कृत वर्गाची जंगी जाहीर सभा बहिष्कृत भारताचे संपादक डॉ. बी आर आंबेडकर, बार-ॲट-लॉ यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.

या सभेतील बाबासाहेबांच्या भाषणातून…
“आपला उद्धार करायला आपणच कंबर कसली पाहिजे. हे काम एका दोघांचे नाही. यात अनेक लोकांनी आपल्या छातीचा कोट करून आपली माणुसकी स्पृश्य लोकांपुढे सिद्ध करून घेतली पाहिजे. या कामात अनेकांचे बळी पडतील. आपल्या पूर्वजांनी रणांगणात आपल्या मनगटातील जोर समशेरीच्या तडाख्यांनी सिद्ध केलेला आहे. आता आपण आपल्या बुद्धिवैभवाने आजच्या सामाजिक दंगलीत आपली श्रेष्ठ जागा पटकाविली पाहिजे!”
~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर