आंबेडकर कुटुंब

🏆🌹🏆🌹🏆🌹🏆🌹🏆🌹🏆

                👤 *आंबेडकर कुटुंब* 👤
===========

                    आंबेडकर कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब
आहे. सकपाळ हे आंबेडकर कुटुंबियांचे मूळ कुटुंबनाव
( आडनाव ) होते त्यामुळे सकपाळ कुटुंब मधील
सदस्यांचीही यादी येथे दिलेली आहे. डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांचे (सकपाळ) कुटुंब हे कोकणमधील आंबडवे या
गावचे होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म मध्य
प्रदेशमधील महू नावाच्या ब्रिटिश छावणीत झाला,
कारण डॉ. आंबेडकरांचे वडिल रामजी मालोजी
सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर तिथे
विद्यमान होते. रामजींच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचे
कुटुंब परत महाराष्ट्रमध्ये आले….

🔮👉🏽  *सकपाळ कुटुंब..*
☘ *पहिली पिढी*
🔹 मालोजी सकपाळ (आजोबा)

☘ *दुसरी पिढी*
*आजोबा मालोजींना ४ मुले व १ मुलगी होती…*
🔹मिराबाई मालोजी सकपाळ (आत्या)
🔹रामजी मालोजी सकपाळ (वडिल)
🔹भीमाबाई रामजी सकपाळ (आई)
🔹जीजाबाई रामजी सकपाळ (सावत्र आई)

🔮👉🏽  *आंबेडकर कुटुंब..*
☘ *तिसरी पिढी..*
रामजींच्या १४ अपत्यांपैकी केवळ ३ मुले व ४ मुली
बगळता बाकी सर्वांचे (७) १-२ वर्षाचे असताना
बालपणीच निधन झाले होते.

🔹बाळाराम रामजी आंबेडकर (भाऊ)
🔹गंगाबाई लाखावडेकर (बहिण)
🔹रमाबाई माळवणकर (बहिण)
🔹आनंदराव रामजी आंबेडकर (भाऊ)
🔹मंजुळाबाई येसू पंदिरकर (बहिण)
🔹तुळसाबाई धर्मा कांतेकर (बहिण)
🔹बाबासाहेब उर्फ भीमराव रामजी आंबेडकर
🔹लक्ष्मीबाई आनंदराव आंबेडकर (वहिणी)
🔹रमाबाई भीमराव आंबेडकर (पत्नी)
🔹सविता भीमराव आंबेडकर (द्वितीय पत्नी)

☘ *चौथी पिढी..*
बाबासाहेबांच्या ५ पैकी ४ अपत्यांचे (३ मुले – रमेश, राजरत्न, गंगाधर व १ मुलगी – इंदू) बालपणीच निधन झाले होते.

🔹यशवंत भीमराव आंबेडकर (मुलगा)
🔹मीराबाई यशवंत आंबेडकर (सून)
🔹मुंकूदराव आनंदराव आंबेडकर (पुतण्या)
🔹शैलेजाबाई मुंकूदराव आंबेडकर (सून)

☘  *पाचवी पिढी…*
🔹प्रकाश यशवंत आंबेडकर (नातू)
🔹अंजली प्रकाश आंबेडकर (नातसून)
🔹रमाबाई आनंदराव तेलतुंबडे (नात)
🔹भीमराव यशवंत आंबेडकर (नातू)
🔹दर्शना भीमराव आंबेडकर (नातसून)
🔹आनंदराज यशवंत आंबेडकर (नातू)
🔹मनिषा आनंदराज आंबेडकर (नातसून)
🔹अशोक मुकूंदराव आंबेडकर (चुलत नातू)
🔹अश्विनी अशोक आंबेडकर (चुलत नातसून)
🔹दिलीप मुकूंदराव आंबेडकर (चुलत नातू)
🔹अल्का दिलीप आंबेडकर (चुलत नातसून)
🔹विद्या काशीनाथ मोहिते (चुलत नात)
🔹सुजाता रमेश कदम (चुलत नात)

☘  *सहावी पिढी…*
🔹सुजात प्रकाश आंबेडकर (पणतू)
🔹प्राची आनंद तेलतुंबडे (पणती)
🔹रश्मी आनंद तेलतुंबडे (पणती)
🔹ऋतिका भीमराव आंबेडकर (पणती)
🔹साहिल आनंदराज आंबेडकर (पणतू)
🔹अमन आनंदराज आंबेडकर (पणतू)
🔹संदेश अशोक आंबेडकर (चुलत पणतू)
🔹चारुलता संदेश आंबेडकर (चुलत पणतूसून)
🔹राजरत्न अशोक आंबेडकर (चुलत पणतू)

🔮👉🏽  *सलग्न कुटुंब…*
*मुरबाडकर कुटुंब*
बाबासाहेबांच्या आई भीमाबाई यांचे हे माहेरचे कुटुंब
🔹लक्ष्मण/धर्माजी मुरबाडकर (आजोबा)

🔮👉🏽  *धुत्रे कुटुंब…*
समाबाई आंबेडकरांचे माहरचे कुटुंब, या धुत्रे कुटुंबीयांचे आधीचे आडनाव वलंगकर होते.
🔹भिकू धुत्रे (सासरे)
🔹रुक्मिणी भिकू धुत्रे (सासू)

🔮👉🏽 *कबीर कुटुंब…*
सविता आंबेडकरांचे माहेरचे कुटुंब
🔹कृष्णराव कबीर (सासरे)
🔹बाळू कृष्णराव कबीर (साले)