आले जगी भीमराया
ह्या दिनजना उद्धराया
पशुतुल्य हिणगणुनी आम्हा छडिले शूद्र म्हणूणी
उठला नरशारगुल गरजूनी तो उठला नरशारगुल गरजूनी
ही जातीयता माराया
आले जगी भीमराया
ही जन्मो जन्मीची शिक्षा तोडण्या धर्म रूढी कक्षा
दिली बौद्ध धम्माची दीक्षा ती दिली बौद्ध धम्माची दीक्षा
बीज समतेच पेराया
आले जगी भीमराया
प्रल्हादा तो भीम गुणाचा कैवारी तो ठरला दिनांचा
उगविला रवी ज्ञानाचा तो उगवला रवी ज्ञानाचा
ह्या धरतीला ताराया
आले जगी भीमराया
ह्या दिनजना उद्धराया