दिक्षाभूमी म्हणजे परिवर्तनाच नाव
दिक्षाभूमी म्हणजे प्रबोधनाच गांव
हजारो पावलांनी चालत येणारी क्रांती म्हणजे दिक्षाभूमी
बुद्धाच्या डोळ्यांतून पाझरणारी शांती म्हणजे दिक्षाभूमी
कोट्यावधी पाखरांच घरटं म्हणजे दिक्षाभूमी
दाही दिशातून उगवणारी पहाट म्हणजे दिक्षाभूमी
दिक्षाभूमी म्हणजे माणसास आलेली जाग
दिक्षाभूमी म्हणजे मनूस लागलेली आग
दिक्षाभूमी म्हणजे न थांबणारे वादळ
दिक्षाभूमी म्हणजे निर्णायक परिवर्तनाची चळवळ
जुलमी परंपरेविरुद्ध रण म्हणजे दिक्षाभूमी
मानवी प्रतिष्ठेसाठी दिलेले आव्हान म्हणजे
बुद्धाने जगाला दिलेली करुणा म्हणजे दिक्षाभूमी
माणसाने माणसासाठी केलेली प्रार्थना म्हणजे दिक्षाभूमी
दिक्षाभूमी म्हणजे परिवर्तनाच नाव.
जय भिम ! नमो बुद्धाय !!!