Song : Lay Bal Aala Majhya Dublya Porat
Singer : Manjusha Shinde
Lyrics : Prakash Jadhav
लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात
लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात
लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात
बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात
बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात
लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात
बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात ।। धृ ।।
गुर ओढणार पोरगा माझा साहेब
तहसिलेतला मोठा नायब आता झाला
त्याचा दरारा असे सरकारी नौकरात
बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात ।। 1 ।।
राजवाड्यातला माणूस आता गावात आला
सा-या गावचा कारभारी आमुचा येडुबा झाला
झाला सरपंच बोलाया लागला जोरात
बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात ।। 2 ।।
एका विहीरीवर पाणी बाया लागल्या शेंदाया
तीथ समतेच मंदीर आता लागल्या बांधाया
नात जुळू लागल खालच्या वरच्या थरात
बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात।। 3 ।।
भाऊ पंगतीत आता बसू लागला प्रकाश
परीवर्तनातला तो दिसू लागला विकास
भर चौकात आता नीघाया लागली वरात
बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात… ।। 4 ।।
लय बळ आल माझ्या दुबळ्या पोरात….
बाबासाहेबांमुळं तुझ्या न माझ्या घरात…….
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.


