नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मासम्बुद्धस्स
नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मासम्बुद्धस्स
बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
राजा, नवकोटीचा राजा
दयाळू दाता माझा
दयाळू दाता माझा आज पूजा गं
पोरं पिंपळपारावर
राजगृहापरी सुंदर
ध्यानस्थ आसनावर
बसविला भीमभास्कर
दर्शनास नारी-नर, येतील गडे दिनभर
लगबगीनं तुम्ही जा जा
लगबगीनं तुम्ही जा जा, जा पूजा गं
ज्याने रूढी बंधनातून
काढिले तुम्हा ओढून
आठवून तयाचे ऋण
व्हा मुक्त तुम्ही त्यातून
गाऊन तयाचे गुण, टाकावे गाव गर्जून
ही अशीच आरती गा जा
ही अशीच आरती गा जा, जा पूजा गं
जावून स्मारकाकडे
जा पूजा पहा ती गडे
कशी रास फुलांची पडे
दरसाल पुण्य एवढे
वर्षात दोनदा घडे, जा रांग लावण्या पुढे
फुलहार घेऊनि ताजा
फुलहार घेऊनि ताजा, जा पूजा गं
गीत:
गायक: श्रावण यशवंते