२६ नोव्हेंबर १९४९ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर बाबासाहेब म्हणाले कि, घटनेचा अंतर्मुख होऊन प्रत्येक भारतीयाने विचार करावा , असे मला वाटते .पुढे ते म्हणाले कि , २६ जानेवारी १९५० ” रोजी आपल्याला राजकीय समता लाभेल पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात असमानताच राहील आणि जर हि विसंगती आपण शक्यतो लवकरात लवकर नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही तर ज्यांना या विषमतेची धग लागेलेली आहे ते लोक घटना समितीने इतक्या परिश्रमाने बांधलेला हा राजकीय लोकशाहीचा मनोरा उध्वस्त करून टाकल्याशिवाय राहणार नाहीत .”
घटनेचे प्रचंड कार्य हातावेगळे केल्यानंतर डॉ. बाबासाहेबांना लोक ” घटनेचा शिल्पकार ” म्हणून त्यांचा गौरव करू लागले . ज्या बाबासाहेबांना शिक्षणापासून वंचित केले, पावलोपावली अपमान केला , अशा एका अस्पृश्य व्यक्तीने या खंडप्राय देशाची घटना लिहून स्मृतिकार व्हावे , आणि डॉ. बाबासाहेबांनी आपल्या कर्तुत्वाने हे सर्व कार्य करून दाखविले . आपल्या घटनाकाराचा भारतभर गौरव करण्यात आला . शे.का. फ च्या कार्यकर्त्यांनी मुंबई दादर येथे नरेपार्क स्वागत सोहळा आयोजित केला. ह्या स्वागत सोहळ्याला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. सगळीकडे निळ्या झेंड्यानि वातावरण दुमदुमले होते .
हुये इस जमाने में कई ‘बादशाहा’…,
पर बादशाहो के बादशाहा मेरे “बाबासाहब” थे.
आरे लोग तो इंन्सानो को गुलाम बनाकर बादशाहा बने,
पर गुलामो को इन्सान बनाने वाले बादशाहा मेरे “बाबासाहब” थे !
हार्दिक हार्दिक शुभेच्छा “
! जय भीम ! !! जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!
——-सविता राजेंद्र बाविस्कर ———


