काळाराम मंदिर सत्याग्रह दिन | 2 मार्च

2 मार्च
काळाराम मंदिर सत्याग्रह दिन

आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत.मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत.आपले प्रश्न राजकीय आहेत,सामाजिक,धार्मिक,आर्थिक आणि शैक्षणिक आहेत.काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे हिंदू मनाला केलेले आवाहन आहे.उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवले.

आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे.

हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारावयास तयार आहे की नाही याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे होणार आहे.
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(२ मार्च १९३०)

काळाराम मंदिर सत्याग्रह वर्धापनदिनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सर्व लढाऊ सहकाऱ्यांना विनम्र अभिवादन..!🙏💐

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?