जय भीम जय अण्णाभाऊ साठे मित्रांनो आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वत्र साजरी केली जात आहे. तळागाळातील लोकांना समाज बांधवांना वरी काढण्याचे महान असे कार्य अण्णाभाऊंनी केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन अण्णाभाऊ साठे यांनी चळवळीचे काम केले. अण्णाभाऊं म्हणायचे की “जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव” अशी सिंहगर्जना करून त्यांनी आपल्या जग प्रसिद्ध ग्रंथ फकीरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण केला.
अण्णाभाऊ साठे हे दीड दिवस शाळेमध्ये जाऊन सुद्धा भल्याभल्यांना लाजवेल असे जागतिक दर्जाचे साहित्य निर्माण केले. आणि त्यांचा साहित्याचा डंका सर्व जगभर पसरला. साहित्याच्या माध्यमातून अण्णाभाऊ नी शाहिरी आणि पोवाडा च्या माध्यमातुन समाज जागृतीचे कार्य केले. ब्राह्मणशाही विरोधात बंड पुकारला.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचे असे कार्य केले. अशा महान योध्यास त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन!
मातांगाचे सामाजिक राजकिय संघटन