दलित साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या काही निवडक कविता

जय भीम मित्रांनो आपण आज नामदेव ढसाळ साहेब यांच्या लेखणीची कमाल आज अनुभवणार आहोत. नामदेवजी ढसाळ हे नाव कोणाला माहिती नाही असे होणार नाही. दलित पँथर चा झंजावात ज्यांनी ज्यांनी अनुभवाला आहे त्यांना नामदेव ढसाळ साहेब यांच्या कार्यानी जाण असणार ह्या मुळीच शंका नाही.

आपण आज पाहुया नामवंत दलित साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या काही निवडक कविता.

1.
बोटाला सुई टोचली
जिव किती कळवळतो,
सूरे तलवारी खसाखस भोकसतात कस वाटत असेल..?
साधा चटका बसला मानुस किती घाबरतो,
साले जिवंत जाळून मारतात कस वाटत असेल..?
साधा पदर ढळला तर बाई किती शरमते,
साले नग्न दिंड काड़तात रे कस वाटत असेल..??
किती यातना,किती अपमान,किती वेदना,कस सोसत असेल..?
आमची हर एक पीढ़ी यांच्या अत्याचारी बलात्कारात कुथत आली,
परिवर्तनाच्या लढाईवर प्रतिगाम्यांचि औलाद निर्दयीपने मुतत आली…!
किती काळ हे असंच चालायच,किती काळ हे सार नीमूट झेलायच्…
आता ठरवलय…
ठेवलेल हत्यार खोलायच
माणसातल जनावर आरपार सोलायच …
करायची आहेत माणस आतून बाहेरून शुद्ध आणि जागवायचाय प्रत्येक मनात
एक बुद्ध
2. महाकवी नामदेव ढसाळ यांची समाजस्थिती विषद करणारी एक कविता…
‘ तहाची कविता ‘
व्हा, रे ..आता शहाणे
शोधू नका ‘ बहाणे..
आपलीच ‘ लोक ‘हरली
आपल्यातल्या ‘ तहा ‘ ने…!
आपल्याच ‘ बहाद्दराने
केलिया ‘आपली ‘ दैना
आपल्या ‘लोकांविरोधी
आपलीच ‘ भिम सैना….!
आपल्यातूनी’ पळाला
शत्रूस ..तो ‘ मिळाला..
देई ऊलट ..आरोळी
‘ तुम्हा ‘ भीमच’ ना कळाला…!”
आपल्याच ‘ माणसाचं
चाले ‘ निराळं ‘ डोकं
आपल्याला’ पाडणारी
आपली ‘खट्याळ ‘लोकं..!”
अकलेचा ‘आलेख ‘आमच्या
कधीही सरळ’ ना “गेला
बापाच्या.. ‘विरोधात
मुलगाच ‘ऊभा’ केला…!”
परक्या ‘घरात ‘सत्ता
आम्हीच ‘देत’ गेलो
आपल्याच समाजाची
‘ मज्जाच ‘ घेत गेलो…!”
सतराशे’ साठ ‘आम्ही
अमुक ‘टमुक’ गटाचे ‘
‘कसू -कसून ‘ आटे
गेलेत.. रे..नटाचे….!”
दोरी’ जरी’ जळाली
तरी ‘ पिळ ‘ जात नाही
टिकाविना ..रिकामा
इथे ‘ ईळ ‘जात नाही..!”
सोडून द्या ते ‘पक्ष’
सोडा मनाचा’ हट्ट’
बांधा एकीची ‘मुठ’
आवळूनी घ्या रे ‘ घट्ट..
कळते बघा आम्हाला,
वळत ..कसे रे नाही…?
त्यांना दिव्याची “गाडी
तुम्हीच का ‘ पायी पायी…?”
आपलेच लोक झाले
आपलेच हाड ‘ वैरी..
झाडून आपल्यावरती
आपल्याच ‘पाच” फैरी…!”
आपलेच ‘ गार ‘ केले
आपल्याच माणसाने
गाऊन पुन्हा आपल्याच
पराभवाचे” गाणे…!”
– पँथर नामदेव ढसाळ
3.
पाण्याविना समाज माझा
जेव्हा तडफडून मरत होता ,
सांगा हिंदुत्वाद्यांनो ,
तेंव्हा देव तुमचा काय करत होता?
सात कोटी दलितांचे ओझे जेव्हा
माझा भीम एकटा पेलत होता ,
तेव्हा डोंगर उचलणारा तुमचा हनुमान
काय झाडावरली माकडं झेलत होता?
बहुजनांच्या मुक्तीसाठी
जेव्हा भिम मनुस्मृती जाळत होता,
तेव्हा विश्वनिर्माता ब्रम्हदेव
तुमचा काय श्रावण पाळत होता .
त्या पुण्यातल्या भिमाकोरेगावमध्ये
जेव्हा एक महार ५६ पेशवे कापत होता
तेव्हा हाती सुदर्शन चक्र घेवून
श्रीकृष्ण,काय मेंढरं राखत होता ….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?