ईव्हीएम द्वारे लोकशाहीची हत्या!

ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणुका घेऊन संविधानातील जे मूल्य आहेत जे लोकशाहीचे तत्त्व आहेत त्यास खूप मोठा आघात पोहंचविण्याचे कार्य सध्या होत आहे. या ईव्हीएम रुपी मशीनचा वापर करून अनेक लोकांच्या भावना सोबत खेळण्याचा प्रयत्न सध्याचे शासन करत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सामान्य जनतेला दिन दलितांना आपला राजा निवडण्याचा निवडण्याचा हक्क  दिला आहे तो ह्या ईव्हीएम मुळे नष्ट होत चालला आहे.

पूर्वीच्या काळात राजा हा एखाद्या विशिष्ट मायेच्या पोटातून जन्म घेत होता पण संविधानाने या सर्व पारंपारिक गोष्टीला, असमानतेच्या गोष्टीला फाटा देऊन त्यांची दुकानदारी बंद करून जो तळागाळातील या देशातील सामान्य जनता मतपेटीमधून जो निर्णय देईल, ज्याच्या बाजुने कल देईल तोच या देशाचा राजा असेल असे ठणकावून सांगण्याचा प्रयत्न भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला.

बंधूंनो आत्ताच ५ राज्या मध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्यापैकी तीन ठिकाणी म्हणजेच छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यामध्ये भाजपाचा विजय झालेला आहे हा विजय संशयास्पद आहे हा विजय अत्यंत चुकीच्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटून हा विजय झालेला आहे असे मा. वामन मेश्राम साहेब यांनी आपल्या निदर्शनास आणुन दिलेले आहे ते आपण ह्या विडिओ मध्ये पाहूया.. .

कारण असे अजून मधून चुपचाप गुपचूप पणे असे प्रयोग केले जातात सामान्य जनतेच्या कधीही लक्षात येणार नाही अशा पद्धतीची छुपी खेळी खेळली जाते. कधी ईव्हीएम मध्ये गडबडी न करता निवडणुका पार पाडतात आणि कधी या ईव्हीएम मध्ये गडबडी करून त्याच निवडणुका जिंकल्या जातात अशा प्रकारची कपटनीती कूटनीती कुटील डाव सध्या केंद्रात असलेले सरकार खेळत आहे आणि समस्त जनतेला उल्लू बनवत आहे वेडे बनवत आहे.

निवडणूक आयोग देशभरामध्ये एवढी मोठी प्रचंड तयारी करते की लोकशाहीच्या मार्गाने पंतप्रधान निवडला जावा लोकशाहीच्या मार्गाने मुख्यमंत्री खासदार आमदार निवडले जावेत आणि संविधानिक मूल्य जपले जावे यासाठी लोकसभा यासाठी निवडणूक आयोग प्रत्येक पाच वर्षाला जे काही निवडणूक घेत असते त्यासाठी एवढी मोठी प्रचंड यंत्रणा कामाला लावली जाते, सर्व गावोगावी खेडोपाडी, तालुका, जिल्हा पातळीवर महानगर मध्ये, मोठ्या शहरांमध्ये निवडणूका घेतल्या जातात. जर आधीच अशी मॅच फिक्सिंग असल्यास ही सर्व उठा ठेव कशासाठी? हा प्रश्न पडतो.

मित्रानो आपण वेळेत जागी झाली पाहिजे जर का हे असेच चालु राहिले तर हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही! भारत देशाला जे स्वातंत्र्य आपल्या देशातील महान नेत्यांनी मिळवून दिलं ते अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सुरुवात या सध्याच्या काळामध्ये ईव्हीएम आल्यापासून झालेली आहे. या ईव्हीएम मुळे राज्यकर्त्यांना कळून चुकले आहे की जनतेसोबत कसेही वागले, त्यांच्या हिताची काम केले काय किंवा न केले काय शेवटी ईव्हीएम मुळे आपण निवडून येणार अशा प्रकारचा विश्वास त्यांना वाटत असल्याने आज जनतेच्या समस्याचा काही एक विचार होत असताना दिसत नाही.

त्यासाठी आपण जनआंदोलन निर्माण करण्याची गरज आहे. माननीय वामन मेश्राम साहेब हे बऱ्याच दिवसापासून ह्याविषयी खूप चांगले कार्य करत आहेत जनतेला अलर्ट करण्याचे काम करत आहेत जो काही निवडणुकीच्या नावाखाली ढोंग चालू आहे त्याचा पर्दाफाश करण्याचे अत्यंत अभिनंदनीय करीत आहेत. त्यांची चळवळ आपण समजून घेतली पाहिजे आपण त्यांना ह्या कार्यात प्रतिसाद दिला पाहिजे आणि एकजूट होऊन अशा या अविचारी मार्गाने जे कृत्य देशद्रोही कृत्य करीत आहेत अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालून ठेचून काढूया

जय भीम जय भारत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?