| श्रेणी | माहिती |
|---|---|
| गीताचे नाव | या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे … या देशाला भिमाईचा भिवा पाहिजे (“Ya Deshala Jijaucha Shiva Pahije … Bhimaicha Bhiva Pahije”) |
| गायक (Singer) | कडुबाई खरात (Kadubai Kharat) |
| गीतकार (Lyricist) | धम्मा धनवे (Dhamma Dhanve) |
| संगीतकार (Composer) | हिरल काम्बले (Hiral Kamble) (DJ HK STYLE) |
| प्रोडक्शन | S.S Production |
अंधार फार झाला दिवा पाहिजे
अंधार फार झाला दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे
या देशाला भीमाईचा भिवा पाहिजे
ते मर्द रांगडे गं
हत्तीचं बळ आहे
शूरवीर होते राजे
भीम विद्वान बाई गं
हे दोघे पण आम्हाला एकत्र पाहिजे
हे दोघे पण आम्हाला एकत्र पाहिजे
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे
या देशाला भीमाईचा भिवा पाहिजे
सुभेदार रामाजीचा लाल
नाव भीमराव आहे
शहाजी राजांचा तो वाघ
नाव शिवराय आहे
कोंढाणा जिंकायला तानाजी पाहिजे
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे
या देशाला भीमाईचा भिवा पाहिजे
नाव शिवबाचे घेता दुश्मन ठार होई
भीमाच्या लेखणीने दिलीया लोकशाही
धम्मान लिहलं गाणं
आवाज माईचा पाहिजे
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे
या देशाला भीमाईचा भिवा पाहिजे
अंधार फार झाला दिवा पाहिजे
अंधार फार झाला दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे
या देशाला भीमाईचा भिवा पाहिजे


