वृध्दाश्रमांना राज्य शासनाचे अनुदान

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नांव वृध्दाश्रमांना राज्य शासनाचे अनुदान
योजनेचा शासन निर्णय शासन निर्णय समाज कल्याण क्रमांक एसडब्लू-1062-44945/एन, दिनांक 20 फेब्रुवारी, 1961
2. योजनेचा प्रकार राज्य
3. योजनेचा उद्देश वयाची 60 वर्ष पूर्ण झालेले पुरुष व 55 वर्ष पूर्ण झालेल्या महिला वृध्द, निराश्रित, अपंग पिडीतांना भोजन, निवास, आश्रय, इत्यादी सोयी-सुविधा पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना वृध्दाश्रमासाठी अनुदान देणे.
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव सर्व प्रवर्गातील वृध्दांसाठी.
5. योजनेच्या प्रमुख अटी लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.

निराधार पुरुष वृध्दाचे वय 60 वर्षे व महिला वृध्दाचे वय 55 वर्ष असावे.

6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप अनुदानित वृध्दाश्रमातील प्रवेशित वृध्दांकरीता भोजन, निवास व औषधोपचार इत्यादी करीता शासनाकडून रु. 900/- दरमहा परिरक्षण अनुदान देण्यात येते.
7. अर्ज करण्याची पध्दत संबंधीत वृध्दाश्रमाकडे व अनुदानित संस्थेकडे, तसेच संबंधीत जिल्ह्यांचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावा.
8. योजनेची वर्गवारी विशेष सहाय्य
9. संपर्क कार्यालयाचे नांव संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हापरिषद/ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?