विपश्यना म्हणजे काय ?

गोयंका गुरुजींचे त्यांच्या सनातन धर्मावर,त्यांच्या रुढी-परंपरेवर अतूट प्रेम व श्रद्धा होती. त्यामुळे परधर्माची विपश्यना त्यांनाभयावह वाटने स्वाभाविक होते.
एका बाजूला मायग्रेनसारखा असाध्य आजार व दुसऱ्या बाजूला भ.बुध्दाची विपश्यना या द्वंद्धात ते सापडले होते.
वयाच्या एकविसाव्या वर्षी गोयंका गुरुजींनी अनिच्छेने का होईना, विपश्यनेचे पहिले शिबिर केले.
अनिच्छेने केलेल्या शिबिराचाही त्यांना लाभ झाला.
१९५५ पासून १९६९ पर्यंत त्यांनी सयाजी उ बा खीन यांच्या मार्गदर्शनाखाली विपश्यनेचा अभ्यास केला.
२२ जून १९६९ रोजी विपश्यना घेऊन ते भारतात आले.
भारत व इतर काही देशात असलेली विपश्यना ही गोयंका गुरुजीमुळे आली आहे.या अगोदर ब्रम्हदेश वगळता ईतर कोणत्याही देशात विपश्यना नव्हती.
विपश्यना म्हणजे काय ?
.गोयंका गुरुजी म्हणतात, विपश्यना ही सत्याची उपासना आहे. सत्याने जगण्याचा अभ्यास आहे. सत्य हे वर्तमान क्षणाचे असते .आठवणी ह्या भुतकाळाच्या असतात. तर इच्छा अपेक्षा या भविष्य काळाच्या असतात. चालू क्षण वास्तव असतो .तो क्षण जगण्याचा अभ्यास म्हणजे विपश्यना.
याक्षणी ना भुतकाळाच्या अठवणी असतात.ना भविष्यकाळच्या कल्पना. जे जसे आहे तसे पहाणे.समजणे म्हणजे विपश्यना.ते जसे आहे तसे ते पहिल्यानंतर
समजल्यानंतर जे आचरण म्हणजे विपश्यना.
विपश्यना ही मनाच्या शुध्दीकरणाची साधना आहे.आपल्या मनातून किती दोष गेले व किती शिल्लक राहिले, किती सद्गुण आले व किती येण्याचे बाकी राहिले, याचे आवलोकन म्हणजे विपश्यना.
विपश्यना ही आपल्या मनाला मलिन होऊ न देणारी साधना आहे .
आपल्यातील दोषांमुळेच मनाला मलिनता येते .मनाला आलेली ही मलिनता विपश्यनेमुळे दुर करता येते.
विपश्यना म्हणजे काय ?
हे समजून घेताना. केवळ ह्या माहितीनुसार तीचे आकलन होईल असे नाही. ते होण्यासाठी दहा दिवसांच्या विपश्यना शिबीरात काय शिकवले जाते हे समजून घ्यावे लागेल.
विपश्यना शिबिराची सुरुवात त्रिसरण पंचशिलेने होते.
दहा दिवसाच्या विपश्यना शिबिरात पहिले तीन दिवस अनापानसतीचे ध्यान शिकवले जाते .अनापानसतीचे ध्यान. ही विपश्यना ध्यानाची पुर्व तयारी असते. मनाच्या एकाग्रतेसाठी या ध्यानाचा उपयोग केला जातो. आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे जाग्रुकतेने पहाणे. त्याचे निरिक्षण करणे म्हणजे अनापानसती .
शिबिरात चौथ्या दिवसापासून विपश्यना शिकवली जाते. शरिरात होणाऱ्या जीव रासायनिक प्रक्रियेला साक्षीभावाने पहाणे म्हणजे विपश्यना.
शेवटच्या दहाव्या दिवशी मैत्री भावनेचे ध्यान शिकवले जाते.
दहा दिवसांच्या विपश्यना शिबिरात सुरवातीचे नऊ दिवस मौन पाळले जाते.
मनाची पूर्ण शुद्धता हे विपश्यनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी मनाची एकाग्रता साधणे आवश्यक असते . आपल्याला दु,:खाच्या मुळाशी आपले विकार असतात. हे विकार जसजसे कमी होत जातात तसतसा सुखाचा मार्ग मोकळा होत जातो.
आपल्या श्वासाच्छवासाचा ,आपल्या मनातील विकारांशी निकटचा संबंध असतो. आपल्याला राग येतो. तेव्हा आपल्या श्वासोच्छवासा ची गती वाढते व राग व भीती कमी होते, तेव्हा श्वासोच्छवसाची गती कमी होते. आपला श्वास अखंडपणे चालू असतो .
अखंडपणे चालू असणाऱ्या येणाऱ्या – जाणाऱ्या श्वासोच्छवासाकडे सजगतेने पाहिले तर आपल्या मनातील विकार आपण ओळखू शकतो. एकदा का हे विकार आपण ओळखू लागलो की मग मनाची साफसफाई सुरू होते.
मन हे चंचल असते. ते कधी भूतकाळातील आठवणीत रमते तर कधी भविष्यकाळाच्या कल्पनेत हरवून जाते .ते वर्तमानकाळात रमत नाही. विपश्यनेमुळे ते वर्तमानकाळात रमण्याची प्रक्रिया सुरु होते.
येणाऱ्या-जाणाऱ्या श्वासाकडे पाहाणे म्हणजे वर्तमानात रमणे होय.जसजसे आपण वर्तमानकाळात स्थिर होत जाऊ ,तसतसी अणेक कोडी उलगडत जातात. मन सुखद आठवणीत रमते व दु:खद आठवणी पासून दूर जाते.
राग ( लोभ ),द्वेष व मोह हे विकारांपासून सुटका होण्यास सुरुवात होते.
आपल्या निर्मळ मनाचा स्पर्श जेव्हा आपल्या अंत:करणातील विकारांशी होतो, तेव्हा मोठी प्रतिक्रिया उमटते. मनाचा व शरीराचा जवळचा संबंध असतो त्यामुळे या प्रतिक्रियांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.त्यामुळे कुणाचे डोके, कुणाचे पाय,तर कोणाचे कंबर दुखू लागते, कुणाचा जीव घाबरतो, तर कोणाला पळून जावेसे वाटते. परंतु जसजशी आपली साधना प्रूष्ट होत जाते, तसतशा या प्रतिक्रिया कमी होत जातात. कमी होत होत हळूहळू त्या नष्ट होतात व नष्ट झाल्यावर सुखशांती मिळते.
या प्रक्रियेत संपूर्ण मौनाचे पालन करून भोजनावर संयम ठेवावा लागतो.
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?