विद्यार्थ्यांनी निरंतर ज्ञानार्जन हेच ध्येय ठेवावे

“विद्यार्थीदशेत ज्ञानार्जन चालू असता विद्यार्थ्यांनी आपल्यापुढे निरंतर “ज्ञानार्जन” हे एकच ध्येय ठेवावे. विद्यार्थीदशा परत प्राप्त होणार नाही. या अवधीत प्रयत्नांची परमावधी करून ज्ञान संपादन करावे. समाजसेवेस पुढील आयुष्यात विपुल काळ आहे. विद्यार्थिदशेत व्याख्यान देऊन समाजाचे होणारे तात्कालिक हित हे पूर्ण ज्ञान संपादन झाल्यानंतर अनेक प्रकारे अधिकार प्राप्तीने सेवा करता येऊन समाजाचे जे हित साधता येईल त्या हितापेक्षा शतपटीने हिणकस आहे. या तत्त्वांची पूर्ण जाणीव ठेवून शिक्षण प्राप्ती हेच आपले सध्याचे ध्येय ठेवावे.” 

~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

दि. १० सप्टेंबर १९३२, दामोदर हॉल, परळ, मुंबई