वाट किती मी पाहू येशील कधी भिवा
मृत्यू समोर उभा हा येशील कधी भिवा
वाट किती मी पाहू येशील कधी भिवा
वाट किती मी पाहू येशील कधी भिवा
इच्छा मनाची या क्षणी डोळे भरून पहावे
डोळे हे मितताना भिवा सामोरी तू असावे
वेळ नको ही लाऊ होती वेदना जीवा
वाट किती मी पाहू येशील कधी भिवा
कंठात जीव आला थांबविले मी त्याला
पाहण्या माझ्या बाळा लाडक्या मम भिवाला
आयुची जोत संपली मावळेल हा दिवा
वाट किती मी पाहू येशील कधी भिवा
तुझा पिता मी झाला भाग्य हे माझे थोर
रामजी सकपाळाची किर्ति ही गाजे भुवर
अंतिम क्षणी प्रभाकरा आसरा तुझा हवा
वाट किती मी पाहू येशील कधी भिवा
मृत्यू समोर उभा हा येशील कधी भिवा
वाट किती मी पाहू येशील कधी भिवा