उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा | Ughadlach Nahi Kalya Ramacha Darwaja Song Lyrics

घटक माहिती
Singer Adarsh Shinde
Lyricist Vaman Dada Kardak
Music By Harshad Shinde
Album / Label Bana Swabhimani (T-Series)

गोदातीरी पडला जरी लढला सैनिक माझा,
गोदातीरी पडला जरी लढला सैनिक माझा,
उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

कानाची कवाडे इथली उघडलीच नाही,
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही,
कानाची कवाडे इथली उघडलीच नाही,
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही,
आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही,

आघाडीवर होता जरी नवं-कोटी चा राजा,
आघाडीवर होता जरी नवं-कोटी चा राजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

माणसास पाणी पाजा,माणसास पाणी,
निनादात होती सारी भिमाचीच वाणी,
माणसास पाणी पाजा,माणसास पाणी,
निनादात होती सारी भिमाचीच वाणी,
निनादात होती सारी भिमाचीच वाणी,

इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा,
इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

दार उघड रामा आता,दार उघड रामा आता,
पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धामा,
दार उघड रामा आता,दार उघड रामा आता,
पांढरी चा चोखा मेळा आला तुझ्या धामा,
पांढरी चा चोखा मेळा आला तुझ्या धामा,

दर्शनाची संधी भीम मागत होता माझा,
दर्शनाची संधी भीम मागत होता माझा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

सर्वांच्या होता पुढे कर्मवीर दादा,
काट्यांचा मार खाणारा होता आमचा दादा,
सर्वांच्या होता पुढे कर्मवीर दादा,
काट्यांचा मार खाणारा होता आमचा दादा,
काट्यांचा मार खाणारा होता आमचा दादा,

जय घोष जय भीमाचा झाला गज वाजा,
जय घोष जय भीमाचा झाला गज वाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

राम दाखवारे तुमचा राम दाखवारे,
वामन ला त्याची थोडी चावे चाखवारे,
राम दाखवारे तुमचा राम दाखवारे,
वामन ला त्याची थोडी चावेचाखवारे,
वामन ला त्याची थोडी चावेचाखवारे,

बोलले पुजारी आता भेडग्यांनो जा जा,
बोलले पुजारी आता भेडग्यांनो जा जा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा।।

गोदातीरी पडला जरी लढला सैनिक माझा,
गोदातीरी पडला जरी लढला सैनिक माझा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा,
उघडलाचं नाही काळ्या रामाचा दरवाजा।।