जमीन जुमला भला तो बंगला
केलाया वारसदार तुला केलाया वारसदार
होता भीमराओ लायी दिलदार तुला फुकट दिलया सार
गावकूसाच्या बाहेर होत तुझ मोड्क तोड्क घर
त्याला सोईच नव्हत दार वर पचाट्याच छप्पर
गळ्यात मड्क पाठिला झाड़ू फिरायचा दारो दार
होता भीमराओ लायी दिलदार तुला फुकट दिलया सार
नव्हत जवड बसत कोणी नव्हत मायेच दिसत कोणी
होता असून नसल्या वाणी नव्हत तुला रे पुसत कोणी
भले भले ते झुकतात आज केला तुला मतदार
जेव्हा केल तुला मतदार
होता भीमराओ लायी दिलदार तुला फुकट दिलया सार
आता हातात आलया फोन आली दारात आली गाड़ी
गाव वेशिच्या बाहेर राहयचा आता गावात बनली माड़ी
गळ्यात सोन हातात सोन बोटात अंगठ्या चार
तुझ्या बोटात अंगठ्या चार
होता भीमराओ लायी दिलदार तुला फुकट दिलया सार
खातो भीमाची तूपवान रोटी नाव भलत्याच घेतोय ओठी
धन बापच बसलाय दाबून काय केलस समाजासाठी
पंगला हा सारा सुनील समाज
बस ना गाड़ी गप गार कस बस ना गाड़ी गप गार
होता भीमराओ लायी दिलदार तुला फुकट दिलया सार