तुकाराम महाराज अभंग

काय करू आता धरुनिया भीड ।
निःशंक हे तोंड वाजविले ।।
नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण ।
सार्थक लाजोनी नव्हे हित ।।
आले ते उत्तर बोले स्वामीसवे ।
धीट नीट जीवे होऊनिया ।।
तुका म्हणे मना समर्थासी गाठी ।
घालावी हे मांडी थोपटुनि ।।
तुकाराम महाराज
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?