थांबवा जरा गाडी, हीच आहे भीमवाडी | Thambava Jara Gadi song lyrics

घटक माहिती
गीतकार समदूर सारंग
गायक Sushma व Manohar

थांबवा जरा गाडी
हीच आहे भीमवाडी
समता आणि शांतीने
नांदती लाडी गोडी

निढळाने जमवूनि पैसा
बांधिले विहार
दिसते दुरुनी घुमट
चौरस्त्याच्या पार
मिळुनी समाज सारा
कष्ट करतो आळी पाळी

जाऊ चला या तिकडे
बुद्धाच्या विहारी
जमले हे सान थोर
नर आणि नारी
बघा समता सैनिक दल
फिरवितात लाठी काडी

धम्म वंदनाहि होते
सांज अन सकाळ
कुणी भीम बुद्धाला
अर्पि पुष्प माळ
मला ऐकू द्या आता
अशोकाची वाणी थोडी