भारताचे राष्ट्रचिन्ह – राजमुद्रा

भारताचे राष्ट्रचिन्ह (राजमुद्रा) हे प्रतीक सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे. बौद्धधम्मास पुनरुज्जीवन करण्याचे महान कार्य सम्राट अशोकांनी केले आहे.

“कोणत्याही देशाचे राष्ट्रचिन्ह हा केवळ त्याचा सरकारी शिक्का नसतो. तर त्या देशाला जी ध्येय व जी मूल्ये प्रिय वाटतात त्याचे ते प्रतीक असते. आपल्यां देशाचे बोधचिन्हे अशोकाच्या नावाशी निगडीत आहेत, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. भारताच्या आणि जगाच्या इतिहासात प्रियदर्शी सम्राट अशोकाचे स्थान अनन्यसाधारण व सर्वात अग्रणी आहे. उच्च कोटीतील आहे.” – डॉ बाबासाहेब आंबेडकर
(भारतीय घटना परिषदेतील भाषण – २ जुलै १९४७ )