प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या मुलांना शिष्यवृत्त्या

प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या बुद्धिमान मुलांनी त्यांचे शिक्षण पुढे चालू ठेवावे म्हणून वरील शिष्यवृत्ती देण्याची योजना अंमलात आणली आहे. त्या शिष्यवृत्त्या ज्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षण मंडळ, विद्यापीठ किंवा मान्यताप्राप्त प्राधिकरण यांनी घेतलेल्या माध्यमिक शाळांत परीक्षांमध्ये किंवा तत्सम परीक्षेमध्ये कमीत कमी ६० टक्के गुण मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनाच मंजूर केल्या जातात. तसेच ह्या शिष्यवृत्त्यांचे विद्यार्थी कला, शास्त्र, वाणिज्य तसेच अभियांत्रिकी, वैद्यकीय, शेती, कायदा, शिक्षक किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील कोणत्याही शाखेतील पूर्ण कालिक अभ्यासक्रम पूर्ण करतील त्यांना ह्या शिष्यवृत्त्या मंजूर केल्या जातात.
हिंदी भाषेतील मॅट्रीक नंतरच्या अभ्यासासाठी अहिंदी भाषिक राज्यातील विद्यार्थ्यांकरिता भारत सरकारच्या शिष्यवृत्त्या.
हिंदी भाषिक नसलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना हिदी शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून ही शिष्यवृत्ती देण्यात येते.
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?