प्रथम नमू गौतमा | Pratham namu gautama song lyrics

शांतीदूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा
प्रथम नमू गौतमा चला हो, प्रथम नमू गौतमा

तथागताची तत्त्वप्रणाली , आचरण्याची मुभा मिळाली
जीवनानंदे आज बहरली , वैशाखी पौर्णिमा

करू बुद्धमय उभ्या धरेला , बेत मनीचा नेत इरेला
रम्य चंद्रमा आज उदेला , इथेच थोडे रमा

शुद्ध शीलाचं लेऊन लेणं , बुद्धं सरणं गाऊ गाणं
करुया पावन अपुले जीवन , होऊन सारे जमा

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?