प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना

आर्थिकदृष्ट्या मागासलेले आणि वंचित नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक कठीण परिस्थितीचा आणि अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो, रस्त्यांवर फिरणारे, बेघर नागरिक, कचरागोळा करणारे, फेरीवाले, रिक्षाचालक, प्रवासी मजूर या नागरिकांना त्यांच्या आर्थिक अडचणींवर मात करता यावी तसेच देशातील गरीब व गरजू लोकांना खाद्य सुरक्षा उपलब्ध करून देता यावी यासाठी केंद्र सरकारने हि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सन 2016 मध्ये सुरु करण्यात आली होती. हि योजना गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अत्यंत लाभकारी ठरली आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु होते, या संपूर्ण लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता, यामुळे सर्व उद्योग, व्यवसाय, कारखाने बंद पडले होते, कारखाने, उद्योग बंद झाल्यामुळे कामगार बेरोजगार झाले, त्यामुळे त्यांच्यासमोर निवाऱ्याचा आणि पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती, कोविड-19 च्या महामारीमुळे देशातील गरीब व कामगारांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले होते, उपासमारीचे हे भीषण संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2022 सुरु केली.

या योजनेच्या अंतर्गत रास्तभाव (रेशन दुकान) दुकानांच्या माध्यमातून गरिबांना मोफत रेशन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हि एक जनकल्याणयोजना आहे या योजनेंतर्गत गरीब आणि गरजू नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मोफत राशन दिले जाते. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची सुरुवात करोना काळात प्रथम लॉकडाऊनच्या दरम्यान माननीय अर्थमंत्री यांनी केली होती, सुरवातीला हि योजना लॉकडाऊन काळापुरतीच संबंधित होती परंतु पुढे वाढत गेलेल्या लॉकडाऊनमुळे या योजनेचा कार्यकाळहि वाढविण्यात आला.

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?