डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना 2022

ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी किंवा शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नोंदणीकृत कामगार, मजूर यांच्या प्रतिभावान आणि गुणवंत विद्यार्थी मुलांना नेहमीच शिक्षण घेतांना त्यांच्या कमी उत्पन्न असण्याचा तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असण्याचा त्रास होतो, त्यामुळे बहुतेकवेळा त्यांना उच्च शिक्षणाला मुकावे लागते, आर्थिक अडचणीमुळे त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत नाहि वाईट आर्थिक परिस्थितीमुळे प्रतिभावान व गुणवान असून सुद्धा त्यांना उच्च शिक्षण सोडून द्यावे लागते, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो शहरामध्ये वास्तव्याचा, काही व्यावसायिक महाविद्यालयात वसतिगृहची सुविधा उपलब्ध असते तर काही ठिकाणी विद्यार्थ्याना जागा भाड्याने घेऊन राहावे लागते.

अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील अल्पभूधारक शेतकरी, नोंदणीकृत कामगार ज्यांच्या मुलांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाला शासकीय महाविद्यालयात किंवा तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अत्यंत मोलाची ठरणार आहे. या योजनेच्या अंतर्गत शासकीय, शासन अनुदानित आणि विनानुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा तंत्रनिकेतन महाविद्यालयात अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता मिळेल, या योजनेच्या अंतर्गत महानगरात जसे मुंबई महानगर, पुणे, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना तीन हजार रुपये ( 30,000/- रुपये दहा महिन्यासाठी) तसेच या शहरांव्यतिरिक्त दुसऱ्या शहरांमध्ये अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये दरमहिन्याला (20,000/- रुपये दहा महिन्यासाठी) वसतिगृह निर्वाह भत्ता देण्यात येईल.

 

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?