🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_सद्धम्म म्हणजे काय?_*
_*(ड) धम्माने सर्व सामाजिक भेदभावांना मूठमाती दिली तरच धम्म सद्धम्म होतो*_
_*२. माणूस जन्माने नव्हे, कमनि श्रेष्ठ किंवा कनिष्ठ होतो. अशी शिकवण असेल तेव्हाच धम्म सद्धम्म होतो*_
*_(क्रमशः)_*
*_!! ॐ मणी पद्मे हूँ !!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
_ब्राह्मण ज्या चातुर्वर्ण्य सिद्धांताचा पुरस्कार करतात तो सिद्धांत जन्माधिष्ठित आहे. एक व्यक्ती ब्राह्मण आहे कारण ती व्यक्ती ब्राह्मण मातापित्याच्या उदरी जन्माला आली आहे. एक व्यक्ती क्षत्रिय आहे कारण ती व्यक्ती क्षत्रिय मातापित्याच्या उदरी जन्माला आली आहे. एक व्यक्ती वैश्य आहे कारण ती व्यक्ती वैश्य मातापित्याच्या उदरी जन्माला आली आहे. आणि एक व्यक्ती शूद्र आहे कारण ती व्यक्ती शूद्र मातापित्याच्या उदरी जन्माला आली आहे._
*_माणसाचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांच्या मतानुसार त्याच्या जन्मावर अवलंबून आहे. अन्य कशावरही नाही._*
*_बुद्धांनी जसा चातुर्वर्ण्यचा सिद्धांत धिक्कारला तसाच हाही सिद्धांत धिक्कारला._* _त्यांचा सिद्धांत ब्राह्मणांच्या या सिद्धांताच्या सर्वथा विरोधी असा होता. *”मनुष्य आपल्या जन्माने नव्हे तर आपल्या कर्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो.”* असा त्यांचा सिद्धांत होता. *माणसाचे मूल्यांकन त्याच्या जन्माने नव्हे तर त्याच्या कर्माने व्हावे अशी त्यांची मान्यता होती.*_
_ज्याप्रसंगी बुद्धांनी आपल्या या सिद्धांताची देशना दिली तो प्रसंगसुद्धा विशेष होता. एकदा तथागत अनाथपिंडकाच्या जेतवनारामात श्रावस्ती येथे वास्तव्याला होते. एके दिवशी माध्याह्नापूर्वी त्यांनी आपले भिक्षापात्र धारण केले आणि ते चारिकेस्तव श्रावस्ती नगरीत प्रवेश करते झाले._
_त्यावेळी यज्ञाग्नी प्रज्वलित होता आणि यज्ञाची तयारी सुरू होती तेव्हा तथागत द्वारोद्वारी चारिका करीत ब्राह्मण याज्ञिकाच्या द्वारी पोहोचले._
_दुरूनच तथागतांना येताना पाहून तो ब्राह्मण क्रोधित झाला आणि म्हणाला, “हे मुंडका, तेथेच थांब, हे करंट्या तेथेच थांब, हे दीन वृषला, हे दीन बहिष्कृता, तेथेच थांब.”_
_*जेव्हा तो ब्राह्मण असे बोलला तेव्हा तथागत त्याला उद्देशून म्हणाले, “हे ब्राह्मणा, वृषल कोण, बहिष्कृत कोण हे तुला माहीत आहे काय? किंवा माणूस कशामुळे वृषल होतो, कशामुळे बहिष्कृत होतो हे तू जाणतोस काय?”*_
_”नाही श्रमण गौतमा, वृषल कोण? बहिष्कृत कोण? हे मी जाणत नाही. आणि खरेच माणूस कशामुळे वृषल होतो बहिष्कृत होतो हेही मी जाणत नाही.”_
_तथागत वदले, “जर वृषल कोण आणि तो वृषल कसा होतो, हे तू जाणून घेतलेस तर त्यात तुझी काहीही हानी होणार नाही.” जर तुझा आग्रहच आहे की मी हे जाणून घ्यावे तर” ब्राह्मण याज्ञिक म्हणाला, “मग तू मला ते स्पष्ट करून सांगावे.’_
_ब्राह्मणाचा असा प्रतिसाद मिळाल्यावर तथागत पुढीलप्रमाणे बोलले,_
१. *“जो माणूस क्रोधी आहे, लोभी आहे, अनैतिक आहे. चहाडीखोर आहे, मिथ्यादृष्टी आहे, वंचक आहे त्याला वृषल जाणावे.*
२. *”कोणीही एकज अथवा द्विज असो, जो या जगी प्राणिमात्रांना आहत करतो, ज्याच्या चित्तात प्राणिमात्रांविषयी करुणा नाही त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे.”*
३. *“जो गावांना, नगरांना वेढा घालून उद्ध्वस्त करतो त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे.”*
४. *”अरण्यात असो अथवा नगरात असो जो दुसऱ्याच्या वस्तूचा अपहार करतो, जो चौर्यकर्म करतो त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे.”*
५. *“जो कोणाचे ऋण घेतो आणि असे म्हणतो की, मी कोणाचेही काहीही देणे लागत नाही आणि पलायन करतो त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे.”*
६. *“जो कोणी एखाद्या क्षुल्लक वस्तूच्या कामनेने वाटसरूचा वध करतो आणि त्याला लुबाडतो त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे.”*”
७. *जो कोणी स्वहितास्तव अथवा अन्य कोणाच्याही हितास्तव अथवा धनलोभाने साक्षीकरिता बोलाविल्यावर खोटी साक्ष देतो त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे.”*
८. *“जो कोणी बलप्रयोगाने अथवा त्यांच्या संमतीने आपल्या आप्तमित्रांच्या भार्याशी व्यभिचार करतो त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे.*
९. *“जो धनधान्य संपन्न असून ज्यांचे यौवन ओसरले आहे अशा आपल्या मातापित्याचा प्रतिपाळ करीत नाही त्याला हे ब्राह्मणा, वृषल जाणावे.”*
१०. *“जो कोणी कुशल धर्माची विचारणा केल्यावर अकुशल धर्माची शिक्षा देतो आणि तीही गूढ रहस्य ठेवून, तेव्हा हे ब्राह्मणा, अशा व्यक्तीला वृषल जाणावे.”*
_*”कोणीही जन्माने वृषल नाही आणि कोणीही जन्माने ब्राह्मण नाही.”* याज्ञिकाने जेव्हा हे श्रवण केले तेव्हा, त्याने तथागतांना शिव्याशाप दिल्याबद्दल तो लज्जित झाला._
*_मंगल होवो! कल्याण होवो! भले होवो!_*
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
*_संकलन – महेश कांबळे_*
*_दिनांक :- २७/०७/२०२४_*
*_संदर्भ :-_*
_*१) भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, तिसरा खंड भाग ५*_
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


