माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती

महाराष्ट्रात भरती झालेल्या किंवा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र दाखल केलेल्या मेजर व नौदल आणि वायुदल किंवा तत्सम दर्जाच्या हुद्द्यापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी हुद्द्यावरून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांच्या मुला-मुलींना/पत्नींना/विधवांना शैक्षणिक सवलती मंजूर करणे.
केंद्र शासन पुरस्कृत
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
राज्यातील मुस्लीम/ख्रिश्चन/बौद्ध/शीख/व पारशी या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.
१. या शिष्यवृत्तीसाठी मागील अंतिम परीक्षेत ५० टक्के गुण असण्याची अट बंधनकारक आहे.
२. सदर अल्पसंख्यांक समाजातील दारिद्र्य रेषेखालील उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल व नंतर उत्पन्न मर्यादेच्या चढत्या क्रमाने पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल.
३. सदर शिष्यवृत्तीधारकास अन्यत्र दुसरी कोणतीही शिष्यवृत्ती अथवा प्रशिक्षण विद्यावेतन घेता येणार नाही.
४. सदर शिष्यवृत्तीधारकाच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सर्व मार्गांनी मिळून लाखापर्यंत असावे ही अट बंधनकारक राहील.
५. सदर शिष्यवृत्तीसाठी एकूण पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थी संख्येच्या ३० टक्के लाभार्थी ह्या विद्यार्थीनी असणेचे अट बंधनकारक राहील.
६. सदर शिष्यवृत्ती प्रत्येक कुटुंबातील फक्त दोन अपत्यांना अनुज्ञेय असलेली अट बंधनकारक राहील.
Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?